आजपासून जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू! तिकिट दर आणि वेळ काय असेल? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता इथून पुढे मराठवाड्यातील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि जलद होणार आहे. कारण आजपासून, जालना ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा ये जा करण्याचा मोठा वेळ वाचेल. तसेच, प्रवास देखील आरामदायी होईल. परंतु या सगळ्यात जालना ते मुंबई सुरू होणाऱ्या वंदे भारतचा तिकिट दर किती असेल? एक्सप्रेस सुटण्याची वेळ काय असेल? एक्स्प्रेस कोणकोणत्या थांब्यावर थांबणार? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

जालना-मुंबई दरम्यान असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला एकूण 8 डबे देण्यात आले आहेत. ही एक्सप्रेस दररोज सकाळी जालना रेल्वे स्थानकातून 5.05 मिनिटांनी सुटेल. यानंतर ती 5.53 वाजता छत्रपती संभाजीनगर, 8.38 वाजता नाशिकमध्ये पोहचेल. तसेच, 11.10 वाजता ठाणे स्थानकावर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 11.55 वाजता पोहोचेल. प्रत्येक एका स्थानकावर ही एक्सप्रेस फक्त दोन मिनिटे थांबेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जालन्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1.10 वाजता सुटेल. पुढे CSMT निघालेली ही एक्सप्रेस ठाण्यामध्ये 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. पुन्हा नाशिकमध्ये सायंकाळी 4.28 वाजता पोहचेल. त्यानंतर, एक्स्प्रेस 4.28 वाजता छत्रपती संभाजीनगरला तर रात्री 8.30 वाजता जालन्यात पोहचेल.

तिकिट दर काय असेल?

आजपासून सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ट्रेनसाठी तिकिटाचे दर 900 ते 100 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद बघता पुढे या दरात बदल देखील करण्यात येईल.