मुंबईत 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी!! नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 4 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमाबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबईतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त यांनी हे जमाबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 4 डिसेंबरपर्यंत मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना कोणत्याही संमेलनात सहभागी होण्यास, मिरवणूक काढण्यास, वाद्य वाजवण्यास आणि फटाकडे फोडण्यास बंदी असेल.

मुख्य म्हणजे जमाबंदीबरोबर राष्ट्रीय हितास बाधा ठरणाऱ्या तसेच राष्ट्रध्वनी कारवायांसाठी कारणीभूत ठरतील अशा घटकांवर देखील बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाण या सर्वांचा समावेश असणार आहे. बंदीचे हे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 18 डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर, मुंबईतील चित्रपट आणि नाट्यगृहे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने याठिकाणी जमाबंदीचे आदेश लागू  नसतील. इतकेच नव्हे तर, मुंबई पोलिसांच्या परवानगीने शांततापूर्ण मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चास देखील हे आदेश लागू नसतील. त्याचबरोबर, क्लब कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था, विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या यांनाही जमाबंदीच्या आदेशातून वगळण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.