Jambukeshwar Mandir : ‘या’ प्राचीन शिवमंदिरात स्त्री वस्त्र परिधान करून पूजा करतात पुजारी; जाणून घ्या पौराणिक कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jambukeshwar Mandir) आपल्या देशात अनेक प्राचीन तशीच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा इतिहास हा अत्यंत वेगळा आणि आश्चर्यचकित करणारा आहे. यातील बरीच मंदिरे त्यांच्या रहस्यमयी कथा तसेच आख्यायिकांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका प्राचीन शिवमंदिराविषयी माहिती घेणार आहात. भारतात हे एक असे मंदिर आहे ज्याचे स्वतःचे एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे आणि म्हणून इथले पुजारी महिलांचे वस्त्र परिधान करून महादेवाची पूजा करतात. यामागील नेमके पौराणिक कारण काय आहे? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

कुठे आहे हे मंदिर? (Jambukeshwar Mandir)

भारतातील तामिळनाडू राज्यात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिर. माहितीनुसार, हे मंदिर ७व्या शतकात बांधलेले अत्यंत प्राचीन मंदिर आहे. दक्षिण भारतातील सर्वात भव्य शिवमंदिर म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. असे मानले जाते की, हे मंदिर हिंदू चोल वंशाचा राजा कोकेनगानन याने बांधले होते. या मंदिराची स्थापना अत्यंत लक्षवेधी आणि तितकीच चित्तथरारक आहे. तसेच या मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका देखील अत्यंत वेगळी आहे. ज्याविषयी आपण माहिती घेत आहोत.

काय आहे आख्यायिका?

देशभरातील प्रत्येक शिवमंदिरात शिव- पार्वती विवाह सोहळा मोठ्या जंगी स्वरूपात केला जातो. मात्र, हे एक असे शिवमंदिर आहे जिथे शिव- पार्वती विवाह सोहळा होत नाही. यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार असे सांगितले जाते की, एके दिवशी महादेवांनी देवी पार्वतीला पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले होते. (Jambukeshwar Mandir) तेव्हा देवी पार्वतीने अकिलंडेश्वरीच्या रूपात पृथ्वीवर अवतरून जंबूच्या जंगलात महादेवाची पूजा केली. ते स्थान म्हणजे हे पावन देवस्थान. त्यावेळी देवी पार्वतीने महादेवाच्या दर्शनाने तपश्चर्या पूर्ण केली. तेव्हा देवी पार्वती शिष्या रूपात आणि महादेव गुरू रूपात असल्याने त्यांचा विवाह केला जाऊ शकत नाही. म्हणून या मंदिरात त्यांच्या मूर्ती एकमेकांसमोर बसवल्या जातात. मात्र त्यांचा विवाह केला जात नाही.

धार्मिक मान्यता

तसेच या शिवमंदिरात देवी पार्वतीची अकिलंडेश्वरी म्हणून तर महादेवाची जंबुकेश्वर म्हणून पूजा केली जाते. मात्र धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वती जेव्हा पृथ्वीवर तपश्चर्या करण्यासाठी अवतरली तेव्हा तिने कावेरी नदीच्या पाण्यातून शिव लिंगाची निर्मिती केली होती. (Jambukeshwar Mandir) त्यामुळे जंबुकेश्वर मंदिरात बसवलेल्या शिवलिंगाला ‘अप्पू लिंगम’ असे म्हटले जाते. पार्वती देवीने जांबूच्या झाडाखाली या लिंगाची स्थापना केली होती आणि त्यामुळे येथे जंबुकेश्वर अर्थात महादेवाचे स्थान निर्माण झाले.

स्त्रियांचे कपडे घालून पुजारी करतात महादेवाची पूजा

जंबुकेश्वर मंदिराबाबत सांगायची अशी आणखी एक प्राचीन प्रथा म्हणजे, या मंदिरातील पुजारी महादेवाची पूजा करताना स्त्रीचे कपडे परिधान करतात. असे करण्यामागचे कारण अत्यंत खास आहे. (Jambukeshwar Mandir) ते असे की, या मंदिरात देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी मोठी कडक तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे देवी पार्वतीला स्मरून इथले पुजारी महिलांचे कपडे परिधान करून महादेवाची पूजा करतात. ही प्रथा अत्यंत प्राचीन असून आजही त्या प्रथेचे जसेच्या तसे पालन केले जाते.