हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा दिग्गज खेळाडू आणि जलदगती खेळाडू जेम्स अँडरसन (James Anderson) लवकरच क्रिकेटला अलविदा करणार आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंग्लंडचा हा महान खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. त्यामुळे क्रिकेटमधील एका पर्वाचा अस्त होणार आहे. गोल्फच्या एका फेरीत अँडरसनने कोच मॅक्युलमला वैयक्तिकरित्या निवृत्तीबद्दल विचारणा केली. कसोटी संघाच्या भविष्याकडे पाहून त्याची विक्रमी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याची वेळ येऊ शकते, असं अँडरसनने मॅक्युलमला म्हटलं आहे.
२००३ मध्ये जेम्स अँडरसनने (James Anderson) क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. जगातील कोणत्याही देशातील मैदान असो, आपल्या इन स्विंग आणि आऊट स्विंगच्या जोरावर अँडरसनने भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं आहे. नुकत्याच भारताविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत त्याने ७०० बळी घेण्याचा विश्वविक्रम केला होता. सध्या अंडरसन ४१ वर्षाचा आहे, मात्र अजूनही त्याची विकेट घेण्याची भूक आहे तशीच आहे, परंतु इंग्लडच्या भविष्यासाठी तो आता क्रिकेटमधून कायमचा ब्रेक घेणार आहे.
इंग्लंडचा संघ जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सहा कसोटी सामने खेळणार आहे. कदाचित हीच अँडरसनची शेवटची कसोटी मालिका असू शकते असं बोललं जातंय. 2025-26 च्या हिवाळ्यात पुढील ऍशेस मालिकेसाठी नवा गोलंदाज तयार व्हावा, यासाठी अँडरसन निवृत्तीची घोषणा करू शकतो, कारण तोपर्यंत 43 वर्षांचा असेल.
कशी आहे जेम्स अँडरसनची कारकीर्द – James Anderson
४१ वर्षीय जेम्स अँडरसनने २००३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आत्तापर्यंत एकूण १८७ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये ७०० बळी घेतलेत. कसोटीमध्ये ४२ धावांत ७ बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर दुसरीकडे जिमीने १९४ एकदिवसीय सामन्यात २६९ बळी घेतले आहेत. तिथेही त्याने स्विंगचा प्रभाव टाकून अनेक दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. इंग्लंडच्या संपूर्ण क्रिकेट इतिहासात जेम्स अँडरसनचे नाव अत्यंत आदराने घेतलं जाईल यात शंका नाही.
मॅक्युलमने नुकतीच अँडरसनला भेट दिली आणि गोल्फच्या एका फेरीत त्याला वैयक्तिकरित्या सांगितले की, कसोटी संघ ‘भविष्याकडे पाहत आहे’ आणि त्याची विक्रमी आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याची वेळ येऊ शकते.
अँडरसन अलीकडेच मार्चमध्ये इंग्लंडच्या भारताच्या कसोटी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी कसोटीत ७०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. इंग्लंड जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध सहा कसोटी सामने खेळणार आहे आणि सुशोभित केलेला डावखुरा वेगवान गोलंदाज निवृत्त होण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केलेल्या टूरच्या शेवटी.