हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडकडून आपली १८८वी आणि शेवटची कसोटी खेळणारा दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) महान फलंदाज म्हंटल आहे. स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना अँडरसन म्हणाला कि सचिनविरुद्ध माझा काही विशिष्ट गेम प्लॅन होता हे मला आठवत नाही. एकदा का सचिन मैदानावर आला कि हाच विचार करायचो कि आता आपण खराब चेंडू टाकू शकत नाही. कारण तो सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.
अँडरसन म्हणाला, त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने महान भारतीय फलंदाज सचिनविरुद्ध गोलंदाजी करण्याचा सर्वाधिक आनंद घेतला. अँडरसनने भलेही सचिनला ९ वेळा बाद केले असेल पण तो सचिन विरुद्ध कोणताही प्लॅन निश्चित करू शकला नाही. सचिन तेंडुलकर भारताचा महत्त्वाचा खेळाडू होता. जर तुम्ही त्याला भारतात बाद केले तर मैदानाचे संपूर्ण वातावरणच बदलत होते इतकी त्याची विकेट खूप मोठी असायची असं अँडरसन म्हणाला. तुम्ही नेहमी तुमची सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करता आणि आशा करता तो सरळ चेंडूवर चुकेल. इंग्लंडमध्ये तो बॅटने एक किंवा दोनदा चेंडूला स्पर्श करायचा पण साधारणपणे मी त्याला लवकर एलबीडब्ल्यू आऊट करण्याचा प्रयत्न करत होतो असं अँडरसन म्हणाला. .
दरम्यान, अँडरसनने भारताविरुद्धच्या 39 कसोटी सामन्यांमध्ये 149 बळी घेतले, भारताविरुद्ध त्याने तब्बल ६ वेळा वेळा एकाच डावात ५ बळी घेतले. तर दुसरीकडे सचिनची बॅट सुद्धा इंग्लंड विरुद्ध नेहमीच तळपली. सचिन आपल्या एकूण कारकिर्दीत इंग्लंडविरुद्धच्या 32 कसोटी सामन्यांमध्ये 51.73 च्या सरासरीने 2,535 धावा केल्या. यामध्ये सात शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. एकूणच काय तर दोन्ही महान खेळाडू एकमेकांविरोधात खूपच चांगलं प्रदर्शन करत होते.