हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा कृषिप्रधान देश (Jamin Mojani)असून जवळपास अनेकजण हे शेतीवर अवलंबून असतात. शेती म्हटलं कि त्याबरोबर अनेकदा जमिनीच्या मोजणीवरून वाद झाल्याचे आपण अनेकदा ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. सरकारी मोजणी बोलवायची म्हंटल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चाला सामोरे जावं लागत. परंतु आता नवीन तंत्रज्ञाच्या मदतीने जमिनीची मोजणी (Jamin Mojani App) करणे एकदम सोपे झाले आहे. आणि विशेष म्हणजे ही मोजणी अगदी मोफत मध्ये आणि तेही अगदी काही मिनिटात तुम्हाला करता येणार आहे. होय, आज आम्ही तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून जमिनीची मोफत मोजणी कशी करायची याबाबत माहिती देणार आहोत.
Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने शेतकरी एकही रुपया सुद्धा न भरता सॅटेलाईटच्या साहाय्याने आपल्या जमिनीची मोजणी (Land Measurement App) करू शकतो. यामुळे जेव्हा आपण शेतात रोपे लावण्यासाठी प्लांटेशन करू तेव्हा आपल्या शेतात नेमकी किती रोपे बसतील याचा अचूक अंदाज तुम्हाला येईन आणि त्यानुसार रोपवाटिकेतून तितकीच रोपे खरेदी करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. मुख्य म्हणजे हे अँप वापरताना तुम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागत नाही. त्यामुळे Hello Krushi अँप च्या मदतीने जमिनीची कशी करायची यासाठी आम्ही खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलोअ करा.
1) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. (Jamin Mojani App)
Link : https://bit.ly/HelloKrushiApp
2) मोबाइलला मध्ये हे ऍप Install केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
3) त्यानंतर ‘हॅलो कृषी’ च्या होम पेजवर ‘उपलब्ध सेवा’ या अंतर्गत विविध विभाग दिसतील.
4) त्यापैकी जमीन मोजणी (Jamin Mojani App) या ऑप्शन वर क्लिक करा.
5)त्यानंतर तुम्ही कुठे आहात ते प्रेसेंट लोकेशन सॅटेलाईट च्या मदतीने दिसेल.
6) आता समजा तुमच्या जमिनीची मोजणी करायची आहे तर डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा ( हेक्तर, एकर ,चौरस मीटर , चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.
7) आता ज्या जमिनीची मोजणी (Jamin Mojani App) करायची आहे त्याचे एक एक कोपरे निवडत चला. म्हणजेच चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.
8) आता जेवढा भाग निवडला गेला आहे तेवढा हिरव्या रंगात दिसेल.
9)शिवाय त्याचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याची आकडेवारी देखील येईल.
हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत? (Jamin Mojani App)
1) हॅलो कृषि अँप वर तुम्ही सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता.
2) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने 1 रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
3) शेतकऱ्यांशी निगडित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ त्याचा घेता येतो.
4) सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे समजतो.
5) हॅलो कृषी या अँप वर तुम्हाला तुमच्या आसपासची खत दुकाने आणि त्यांचे मोबाईल क्रमांक मिळतील.
6) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
7) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
8) शेतकऱ्याने स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.
शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला शेतीशी निगडित कोणती कायदेशीर प्रक्रिया करायची असते तेव्हा तुम्हाला रीतसर मोजणी बोलावूनच तुमच्या जमिनीची मोजणी (Land Measurement App) करून घ्यावी लागते. परंतू त्या संपूर्ण सरकारी प्रक्रियेला वेळ आणि पैसे दोन्हीही जाण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्हाला वैयक्तिक पातळीवर जमीन किती भरतेय? कमी भरतोय कि जास्त भरतोय हे पाहायचे असेल तर हॅलो कृषीची हि सुविधा तुमच्या फायद्याची ठरू शकते.