Jamin Mojani : शेतजमिनीची मोजणी फक्त 2 मिनिटांत; ते सुद्धा अगदी Free मध्ये; कसे ते पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे. देशातील अनेकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. परंतु मित्रानो, शेती म्हंटल की त्याच्या जागेवरून वाद हे आलेच. बांधाला बांध रेटल्याचा आरोप करत अनेकदा सक्खे शेजारी एकमेकांशी वाद घालत असल्याचे आपण पाहिले असेल. त्यातच सरकारी जमीन मोजणी (Jamin Mojani) बोलवायची म्हंटल तर वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होतं. परंतु चिंता करू नका, कारण यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविधा घेऊन आलो आहोत. ती सुविधा म्हणजे Hello Krushi मोबाईल अँप…..

शेती करत असताना शेतकऱ्यांचे जीवनमान सोप्प व्हावं, त्याच काम हलकं व्हावं आणि कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन Hello Krushi अँप तयार करण्यात आलं आहे. या अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेतजमीन, कोणतेही मैदान किंवा कंपाऊंडची मोजणी अगदी (Jamin Mojani) फुकट मध्ये आणि अवघ्या काही मिनिटात मोजू शकता. तसेच या सुविधेमुळे जर तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार करत असल्यास तर जमिनीच्या लांबी- रुंदी नुसार नेमकी किती रोपे लागतील याचाही अचूक अंदाज तुम्हाला हॅलो कृषी मधून मिळणार आहे. चला… Hello Krushi अँप वरून जमिनीची मोजणी कशी करायची हे आज आंम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने सांगणार आहोत.

1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link :https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी हे अँप Install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती टाका .

3) त्यानंतर तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी या पर्यायावर क्लिक करा

4) क्लीक करताच आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.

5 ) आता तुमची शेतजमीन नेमकी किती भरतोय हे पाहण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा. ( हेक्तर, एकर चौरस मीटर, चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.

6 ) आता तुम्हांला जी जमीन मोजायची त्याचे एक – एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.

7 ) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.

8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याचा अचूक आकडा तुम्हाला दिसेल.

शेतकरी मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त जमीनच मोजता (Jamin Mojani) येत नाही तर शेतीशी संबंधित अनेक सोयी – सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, रोजचा हवामान अंदाज, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी थेट अर्ज, यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ मिळतोय. महत्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. हॅलो कृषीमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा मिळतात त्या आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगतो.

हॅलो कृषीच्या माध्यमातून खालील सुविधा मिळतात- (Jamin Mojani)

1) हॅलो कृषीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीविषयक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील.

2) हॅलो कृषिवरून शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करता येतो आणि त्याचा आर्थिक फायदा घेता येतो.

3) तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे कळतो .

4) महाराष्ट्रातील सर्व बाजारसमित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव एका क्लीक मध्ये समजतो.

5) हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भू- नकाशा काढता येतो.

6 ) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने अगदी 2 मिनिटात मोजता येते.

7) तुमच्या आसपास असलेल्या सर्व रोपवाटिका, कृषी केंद्र, खत दुकानदार यांच्याशी थेट संपर्क साधता येतोय.

8) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.

9) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो.