Jamin Mojani : फुकटमध्ये मोजा तुमची शेतजमीन, ते सुद्धा फक्त 2 मिनिटांत; ‘ही’ Trick वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील बहुतांश लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हंटल की शेतजमिनीवरून वाद आलाच.. अनेकदा तर आपण जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यावरून भावाभावात वाद होताना बघितलं आहे. अशावेळी कोणाला नेमकी किती जमीन आहे हे मोजण्यासाठी सरकारी मोजणी मागवायची म्हणली तर त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो. यावरून मार्ग काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविधा घेऊन आलो आहोत. ती सुविधा म्हणजे Hello Krushi मोबाईल अँप….हॅलो कृषी या अँपच्या माध्यमातून तुम्ही फक्त 2 मिनिटात तुमची जमीन मोजू शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही.

शेतकऱ्यांचे जीवनमान सोप्प व्हावं, शेती करताना त्याला त्रास होऊ नये, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हॅलो कृषी अँप बनवलेलं आहे. या अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेतजमीन, कोणतेही मैदान किंवा कंपाऊंडची मोजणी याद्वारे अगदी फुकट मध्ये करू शकता. याशिवाय जर तुम्ही शेतात रोपे लावण्याचा विचार करत असाल तर जमिनीच्या लांबी- रुंदी नुसार नेमकी किती रोपे लागतील याचाही अचूक अंदाज तुम्हाला हॅलो कृषी मधून मिळणार आहे. चला… Hello Krushi अँप वरून जमिनीची मोजणी (Jamin Mojani) कशी करायची हे आता आंम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीने सांगणार आहोत .

1) सर्वात आगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जावा आणि तिथे Hello Krushi असं सर्च करून ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link : https://bit.ly/HelloKrushiApp
2) हॅलो कृषी install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक माहिती भरा.
3) त्यानंतर तुम्हाला ‘हॅलो कृषी’ चे होम पेज दिसले. त्यावरील जमीन मोजणी या ऑप्शनवर क्लिक करा
4) क्लीक करताच आत्ता तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन तुम्हांला सॅटेलाईटच्या मदतीने दिसेल.
5) आता तुमच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा ( हेक्तर, एकर ,चौरस मीटर , चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.
6) आता तुम्हांला जी जमीन मोजायची आहे त्याचे एक -एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.
7) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.
8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याची आकडेवारी तुम्हाला दिसेल.

मित्रांनो, हॅलो कृषीवर फक्त जमीनच मोजता येत नाही तर शेतीशी संबंधित अनेक सोयी- सुविधा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये रोजचा बाजारभाव, जमिनीचा सातबारा उतारा, रोजचा हवामान अंदाज, शेतीविषयक बातम्या, शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणाऱ्या अनेक सरकारी योजना, कृषी सल्ले यांसारख्या अनेक गोष्टी तुम्हाला पहायला मिळतात. आम्ही या सर्व गोष्टी खाली सविस्तरपणे सांगत आहोत, त्या एकदा वाचाच….

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा मिळतात ?

1) हॅलो कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर मोबाइलवरूनच अर्ज करून त्याचा आर्थिक फायदा घेता येतो.
2) हॅलो कृषीवर तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज अचूकपणे समजतो.
3) राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील शेतमालाचा बाजारभाव एका क्लीक मध्ये दिसतोय .
4) हॅलो कृषीच्या माध्यमातून अगदी काही मिनिटात सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भू- नकाशा काढता येतो.
5) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने 1 रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
6)आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
7) शेतीशी निगडित जुनी वाहने, जनावरे, तसेच शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
8) तुम्ही पिकलवेला शेतमाल तुम्हाला तुम्हाला हव्या त्या किमतीत विकता येतो.
9) जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येते. यासाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, शेती करत असताना त्याला जास्त कष्ट करावं लागू नये त्याला आर्थिक लाभ व्हावा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन हॅलो कृषी शेतकऱ्यांना या सर्व सोयी- सुविधा अगदी मोफत मध्ये देत आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा आणि सर्व सोयीचं लाभ घ्या.