काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची गळा चिरून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया (Hemant Lohia) यांची हत्या करण्यात आली आहे. लोहिया (Hemant Lohia) यांची त्यांच्या घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आली आहे. लोहिया (Hemant Lohia)  यांच्या नोकरानेच हि हत्या केली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी हि घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

लोहिया यांना ऑगस्टमध्येच जम्मू-काश्मीरच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली होती. जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी लोहिया (Hemant Lohia) यांच्या घरी भेट दिली. लोहिया यांच्या शरीरावर भाजलेल्या खुणा होत्या आणि त्यांचा गळा चिरलेला असल्याचे त्यांनी सांगितले. लोहिया हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत लोहिया यांचा गळा चिरण्यासाठी केचपच्या बाटलीचा वापर करण्यात आला. नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोहिया (Hemant Lohia) यांच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांना त्यांच्या खोलीत आग लागल्याचे दिसल्यानंतर त्यांनी गेट तोडून खोलीत प्रवेश केला तेव्हा खोली आतून बंद होती. या प्रकरणातील आरोपी नोकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लोहिया यांच्या निधनावर जम्मू-काश्मीर पोलिसांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर