सातारा प्रतिनीधी | महाराष्ट्र राज्यात कोव्हीड १९ या रोगामुळे दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्याला यामध्ये हातभार लावण्याकरीता हभप दत्तात्रय कंळबे महाराजांच्या विचाराचा वारसा जोपासत जावली बँकेच्या १९ संचालकांनी ११ लाख रुपायाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता दिला आहे. जावली बँकेने कोरोना विषाणु विरोधात मुख्यमंत्री सहाय्यरा निधीस मदत करुन सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला आहे.
जावली बॅकेचा वसा सदैव सामाजिक बांधिलकी असुन महाराष्ट्र राज्यावर ज्या ज्या वेळेला संकट आले त्यावेळेस जावली बॅंकेने सदैव मदतीचा ओघ पाठवला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळातही जावली बँकेच्या संचालक मंडळाने कोल्हापुर पुरपरीस्थीत ११ लाख रुरायांची मदत महाराष्ट्राला केली होती.
दरम्यान, जावली तालुक्याची अर्थनाडी व सहकारातील वटवृक्ष म्हणुन नावलौकीक असलेल्या ह भ प दत्ता कळंबे महाराजांनी लावलेल छोटेशा रोपट्याच आज वटवृक्ष झाले आहे. हभप दत्तात्रय कळंबे महाराजांशी सर्वसामान्य जनतेच्या हीताकरीता सदैव बॅकेची जोपासना केली.