मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनंतरच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे आता म्हणून मनोज पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधिमंडळात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “काल मी मनोज जरांगे-पाटील यांचा व्हिडिओ बघितला. यामध्ये महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्यामागे कटकारस्थानाची भाषा आहे. जरांगेंची भाषा त्यांना शोभत नाही. राज्यात पंतप्रधानांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. तसेच आमच्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी” त्यांनी केलेला या मागणीनंतरच विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, SIT चौकशीच्या आदेशावरून जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “एसआयटी चौकशीमध्ये जर माझं सगळं खरं निघालं तर एसआयटीला मात्र, देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावं लागेलं. यत्रंणा मात्र, घटनेला आणि कायद्याला धरून वापरा, तुम्ही निष्पक्षपातीपणे लढा. पण, मी खरा असेल तर ज्याने एसआयटी चौकशी लावली त्यांना जेलमध्ये टाकावं लागेल. कारण मला माहिती आहे. मी पळपुटा नाही, एसआयटी चौकशीसमोर मी सगळं सांगतो” असे जरांगे पाटील यांनी म्हणले आहे.