यापुढे सरकारशी चर्चा करणे पूर्णपणे बंद; जरांगे पाटलांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मुंबईमधील मराठा आंदोलकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “इथून पुढे मी किंवा मराठा आंदोलन सरकारसोबत कसलीही चर्चा करणार नाही” अशी मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. थोडक्यात, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारशी सुरू असलेल्या चर्चेला जरांगे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

सध्या राज्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना देखील सरकारने यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. राज्य सरकार मराठा समाजाला फक्त आश्वासने देताना दिसत आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलन थेट मुंबईत जाऊन करायचे असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. याविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असून, तब्बल 2 कोटी मराठे मुंबईत येतील. आता मुंबईतल्या आंदोलकांच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी आहे.”

त्याचबरोबर, “मुंबई आंदोलनासाठी दीड लाख स्वयंसेवक तयार करत आहोत. वकिलांची 200 जणांची टीम असून, 1500 डॉक्टरांची टीम लागणार आहे. दीड महिन्याचे अन्न सुरवातीला घेऊन जाणार आहे. मुंबईला जाताना रस्त्याने पिकांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. तसेच, मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही” असे देखील जरांगे पाटील यांनी म्हणले.

दरम्यान, गेल्या अनेक काळापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा टांगणीला लागला आहे. मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देखील लागले होते. यात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, सरकार लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिले होते. यात सरकारला निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील आणि मराठा समाजाने मुंबईला जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.