Maratha Aarakshan : सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली! जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र आज ही मुदत संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. तसेच, राज्यात आज साखळी उपोषणालाहि सुरुवात होणार आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करतील. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शेवटची संधी म्हणून जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 40 दिवसांचे अल्टिमेटम दिले होते. त्यानुसार, आज म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी हे अल्टिमेटम संपले आहे. यामुळे आज पासून राज्यात मराठा बांधवांकडून पुन्हा साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आजपासून मनोज जरांगे पाटील देखील आमरण उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण सुरू करण्यापूर्वी 11 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेतील.

राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावत नसल्यामुळे मराठा समाजाने आक्रमणाची भूमिका घेतली आहे.. इतकेच नव्हे तर, पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला पाठिंबा देत पाठिंबा देत, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढार्‍यांना गावात पाय ठेवून देणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, “आज 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार. नेत्यांनी आमच्या गावात यायच नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही” असे मनोज जरंगे पाटील यांच्याकडून सरकारला सांगण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला काल झालेल्या दसरा मेळाव्यात “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेत सर्वांना न्याय मिळवून देईन, ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत राज्यात काही घडामोडी घडतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.