Mumbai Indians ला मोठा झटका!! बुमराह IPL मधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2023 ला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. मुंबईचा स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे IPL मधून बाहेर पडला आहे. बुमराहच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. बुमराहच्या अनुपस्थीमुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजी कमजोर झाली आहे.

बुमराह अद्याप दुखापतीतून सावरलेला नसून त्याच्या पाठीवर लवकरच शस्त्रक्रिया होऊ शकते. पाठदुखीमुळे बुमराह गेल्या वर्षी आशिया कप आणि टी-20विश्वचषक खेळू शकला नव्हता. याशिवाय 7 जूनपासून ओव्हल येथे होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही बुमराह खेळू शकणार नाही. त्यामुळे फक्त मुंबई इंडियन्सच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा मोठा झटका बसला आहे.

जसप्रीत बुमराह सध्याच्या भारतीय संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आयपीएल मध्ये सुद्धा त्याने मुंबई इंडियन्स ला अनेक रोमांचक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. बुमराहने आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत 120 सामन्यात 145 बळी घेतले आहेत. आयपीएल सारख्या क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅट मध्ये बुमराह सारखा गोलंदाज सर्वानाच हवाहवासा वाटेल. मात्र त्याच्या दुखापतीमुळे आता मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्मासाठी मोठा धक्का मानला जात आहे.