‘किंग खान’ची जादू अजूनही कायम; जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 800 कोटींच्या पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आलेला प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहतो. तसेच प्रत्येक चित्रपटाची कथा ही काही हटकेच असते. तशीच सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडणाऱ्या जवानची (Jawan Movie) आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जवान धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या ‘जवान’ने 11व्या दिवशीही तब्बल 34.5 कोटींची भरभक्कम कमाई करत ८०० कोटींचा आकडा गाठला आहे.

जवानने केला 800 कोटींचा आकडा पार 

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटगृहांमध्ये दुसऱ्या आठवड्यातही ऐतिहासिक रन सुरू ठेवत आहे. या चित्रपटाने जगभरात 800 कोटींचा आकडा आधीच ओलांडला असून अजूनही चित्रपटाची जोरदार कमाई चालू आहे. अवघ्या 12 दिवसांत हा चित्रपट आता देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा गाठत आहे. सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली होती. मात्र तरीही आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी दोन अंकी कमाई करण्यात जवान यशस्वी झाला आहे. भारतात 12 दिवसांचे एकूण कलेक्शन 493.63 कोटी रुपये झाले आहे. 18 सप्टेंबर रोजी चित्रपटाने 23.92 टक्के व्यवसाय नोंदवला.

$100 दशलक्षपेक्षा जास्त कमाई करणारा SRK ठरेल हा एकमेव भारतीय अभिनेता

जवान जगभरात चांगले काम करत आहे. आतापर्यंत चित्रपटाने 858 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, पठाणने जागतिक कमाईमध्ये $130 दशलक्षसह विक्रम केला होता, ज्यामुळे तो शाहरुख खानचा सर्वात हिट चित्रपट ठरला होता. सुमारे $250 दशलक्ष कमावणाऱ्या आमिर खानच्या दंगलनंतर हा जगातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. जर जवानने पठाणचे जागतिक बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडीत काढले, तर एका वर्षात $100 दशलक्षपेक्षा जास्त कमाई करणारे SRK हा एकमेव भारतीय अभिनेता असेल.

चित्रपटातून सामाजिक आणि राजकीय समस्यांवर प्रकाश 

तमिळ चित्रपट निर्माते एटली दिग्दर्शित ‘जवान’ मध्ये नयनतारा आणि विजय सेतुपती तसेच दीपिका पदुकोण देखील विशेष भूमिकेत आहे. ‘जवान’ ही एक पिता-पुत्राची कथा आहे, जी शाहरुखने लिहिलेल्या नायकाद्वारे विविध सामाजिक आणि राजकीय समस्यांवर प्रकाश टाकते. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा तसेच संजय दत्त देखील छोट्या भूमिकेत आहेत.