उत्तर तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयसिंग पाटील तर उपसरपंचपदी विद्या साठे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायतीत 22 वर्षानंतर सत्तांतर झाल्यानंतर आज सरपंच निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंचपदी जयसिंग बंडू पाटील यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी विद्या सोमनाथ साठे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शिवलीला थोरात यांनी काम पाहिले. मतदान झाल्यानंतर विजयी सरपंच व उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची अतिषबाजी केली.

कराड तालुक्यातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटाला सत्तांतर करण्यात यश आले. निवडणूकीत 7 पैकी 4 जागा जिंकल्या तर सत्ताधारी गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी शशिकांत चव्हाण आणि उपसरपंच पदासाठी रोहित चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु विरोधी दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला.

सध्याच्या सत्ताधारी गटात सोमनाथ साठे, बानूबी मुल्ला, रूपाली पवार यांचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून समावेश आहे. सरपंच व उपसरपंच यांचे युवा उद्योजक सचिन पवार, संदिप पवार, सागर चव्हाण, अजय पवार, दिपक पवार, विकास पाटील, दादासो पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शिवलीला थोरात, तलाठी विठ्ठल कोकरे, ग्रामसेवक कोळी उपस्थित होते.