आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार; जयकुमार गोरे यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकेकाळी बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. याचे परिणाम सर्वांनी पाहिले महाराष्ट्रावर मोठे संकट आले. आम्हाला खूप वेदना झाल्या पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू,” असे मोठे विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी केले.

भिलार, ता. महाबळेश्वर येथे सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराचा नुकताच समारोप झाला. यावेळी आ. जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, रवी अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. गोरे म्हणाले की, बारामतीच्या पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे? पण त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात आपली लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादीबरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची आपली मानसिकता असायला पाहिजे.’

माझा अपघात झाला तो बारामतीने केला, की फलटणने केला याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एका जयकुमारने लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं? आपण यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात आपला पक्ष त्यांनी वाढवला. परंतु 40 वर्षे एकहाती पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं? सर्व विकास केंद्रे बारामतीला नेली, कर्मवीर, यशवंतराव या संस्थांबरोबर त्यांनी औंधचे संस्थानही ताब्यात घेतले. आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे, असा इशारा गोरे दिला.