व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ‘मविआ’ एकत्रित लढणार; जयंत पाटील यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी भाजप आणि शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आज तिन्ही आघाडीतील नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आगामी शिक्षक -पदवीधर निवडणुकीसाठी एकत्रित येऊन लढण्यावर आमचे एकमत झाले आहे.

आजच्या बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेनुसार अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. लवकरच अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आला असून नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झाला आहे शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.