व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वेदांत वाला आला होता; जयंत पाटलांकडुन एकनाथ शिंदेंचा ‘तो’ Video शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. वेदांत बाबत २० दिवसात एवढा मोठा बदल कसा झाला?? असा सवाल केला

अनेक उद्योगपती येतायत. तो वेदांता वाला आला होता, जवळपास ४ लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येतायत आपल्याकडे अस एकनाथ शिंदे सदर व्हिडिओ मध्ये बोलताना दिसत आहेत. २५ ऑगस्ट २०२२ रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हे सभागृहातील विधान आहे. त्यानंतर फक्त २० दिवसात एवढा मोठा बदल कसा घडला, यात कोणाचा हस्तक्षेप होता, कोणाचा दबाव होता याचे उत्तर संपूर्ण राज्यातील जनतेला व विशेषतः युवा वर्गाला अपेक्षित आहे अस जयंत पाटील यांनी म्हंटल.

दरम्यान, वेदांत प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी यावरून शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरले असताना दुसरीकडे हा प्रकल्प गुजरात ला जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार आहे असा आरोप सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे या विषयावरून राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत राहणार हे मात्र नक्की….