भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! जयंत पाटलांचा खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीने महत्वाचे असलेल्या पुणे शहराला पावसाने चांगलेच झोपडले आहे. काल आणि आजच्या सततच्या मुसळधार पावसाने पुण्यातील रस्ते तुंबले आहेत. संपूर्ण पुणे शहर जलमय झालं आहे . पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे. भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. या एकूण परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.