जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? 10 कारणे!!! ‘त्या’ Tweet ची जोरदार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्षपदी नेमलं. तर इकडे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी सुरु झाली आहे. हे सगळं सुरु असतानाच भाजपने एक मोठा बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. येव्हडच नव्हे तर एक विडिओ शेअर करत भाजपकडून याबाबतची 10 कारणेही सांगण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

भाजपकडून सांगण्यात आलेली कारणे काय?

1) शरद पवार यांनी जे काही निवृत्ती नाट्य केलं त्यात बेस्ट परफॉर्म जयंत पाटील यांनी केला. पवारांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील हे रडले होते. ते रडणं खरं होतं पण त्यामागील कारण वेगळं होत. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आपलं होणार कसं? हे त्यामागचं खरं कारण होतं.

2) 2019 पासूनच शरद पवारांनी जयंत पाटील यांना डावलायला सुरुवात केली. कधीकाळी गृहमंत्रीपद भूषविलेल्या जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याऐवजी जलसंधारण मंत्रीपद देऊन त्यांची नाचक्की होती.

3) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि सुप्रिया सुळे गट असे 2 गट आहेत, पण जयंत पाटील याही गटाचे नाहीत आणि त्याही गटाचे नाहीत.

4) जयंत पाटील हे महत्त्वकांक्षी नेते आहेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची पडणारी स्वप्ने लपून राहिली नाहीत

5) सुप्रिया सुळे राष्ट्रीय कार्याध्यक्षा बनल्यानंतर अजित पवारांचेच वांदे झालेत, मग जयंत पाटलांच्या स्वप्नाला कोण विचारणार ?

6) महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद भूषवायचं होत पण तेव्हाही त्यांची झोळी रिकामीच राहिली.

7) पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष नेमताना शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची निवड करून दोन्ही गटांना समाधानी केलं, पण जयंत पाटलांना फक्त ठेंगा मिळाला.

8) राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रीय स्तरावरील निर्णय शरद पवार घेतात त्यामुळे जयंत पाटील हे नामधारी प्रदेशाध्यक्ष आहेत.

9) भविष्यात कधी शरद पवार निवृत्त झालेच तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हाताखाली काम करणं जयंत पाटील यांना कठीण होईल.

10) जयंत पाटील यांना आपला मुलगा प्रतीक जयंत पाटील याला राजकारणात पुढे आणायचं आहे. त्यासाठी त्याला राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पण केलं. परंतु इथं सक्ख्या पुतण्याला डावलणारे शरद पवार जयंत पाटलांच्या मुलाला संधी देतील का? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

दरम्यान, भाजपच्या या व्हिडिओनंतर मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. खरंच जयंत पाटील हे राष्ट्रवादीत नाराज आहेत का? अशा चर्चाना ऊत आलाय. त्यामुळे भाजपच्या या दाव्यानंतर आता जयंत पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष्य लागलं आहे.