केरळ | प्रतिनिधी
साधारण महिनाभर आधी केरळमधील पुरपरिस्थितीने तेथील जनतेला हादरवून टाकलं होतं. या पुरपरिस्थितीत साधारण ६० लोकांचा जीव वाचविण्याचं काम करणाऱ्या जीनेश जेरोले या मच्छीमार तरुणाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकाने त्याला धडक दिली होती. चेंगनूर या ठिकाणी NDRF चा मदत गट येण्यापूर्वी जीनेशने आपल्या मित्रांसहित धाव घेतली होती. पुनथुरा गावचा रहिवासी असणारा जीनेश वयाच्या १२ व्या वर्षापासून मासेमारी व्यवसायात काम करीत होता. तो आणि त्याच्या ४ मित्रांनी मिळून केरळमधील पुथीयथुरा, अंजूनेंगु, आणि पुनथुरा येथील रहिवासी लोकांना पुरपरिस्थितीतुन सुखरूप बाहेर काढलं होतं. त्याच्या अकाली मृत्यूने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या नायकत्वाची माहिती देणारे पोस्टर्सही गावभर लावले गेले आहेत.