Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; 399 रुपयांत मिळतोय OTT प्लॅटफॉर्म अन् अन्य सुविधांचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सतत त्यांच्या युजर्ससाठी वेगवेगळे प्लॅन्स आणत असते. जेणेकरून त्यांचे यूजर्स वाढतील आणि त्यांना योग्य ऑफर्स चा लाभ घेता येईल. जर तुम्हाला सुद्धा असाच रिचार्ज प्लॅन हवा असेल, ज्यामध्ये तुम्हाला कमी किंमतीत ओटीटी प्लॅटफॉर्म ची सुविधा आणि वेगवेगळ्या ऑफर्स मिळतील. मग आज आम्ही तुम्हाला जिओचा एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन सांगणार आहोत. यामध्ये फक्त ३९९ रुपयांत नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिजनी हॉटस्टार यासारखे ओटीटी प्लॅटफॉर्मचा फ्री ऍक्सेस दिला जात आहे.

जिओ फ्री OTT सबस्क्रिप्शन रिचार्ज

जिओ च्या वेगवेगळ्या प्लॅन्स पैकी हा एक अप्रतिम प्लॅन आहे. यात ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिजनी हॉटस्टार यांचे फ्री ऍक्सेस दिला जात आहे. या प्लॅनची किंमत 399 रुपये एवढी आहे. या प्लॅन नुसार तुम्हाला 1 वर्षासाठी OTT प्लॅटफॉर्मचा लाभ मिळू शकतो.

रिलायन्स जिओ पोस्टपेड प्लॅन Rs 399

रिलायन्स जिओ चा हा पोस्टपेड प्लॅन आहे. जो तुम्हाला 399 रुपयात मिळू शकतो. यासोबतच कॉलिंग आणि डेटा फायदे देखील या ऑफर मध्ये उपलब्ध आहे. यात तुम्हाला 399 रुपयांत 75GB डेटा मिळतो. याचा डेली डेटा सोबत कोणताही फायदा होत नाही. म्हणजेच हा 75 GB डाटा तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी दिला जातो. हा डाटा तुम्ही हवं असल्यास एका दिवसात देखील संपवू शकतात. एवढंच नाही तर या प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देखील आहे . याद्वारे डेटा संपल्यानंतर, युजर्स 1 GB डेटा मिळविण्यासाठी 10 रुपये देऊन डेटा ऍड करू शकतात.

जिओ प्लॅन 399 रुपये

जिओ चा हा प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस ऑफर सह मिळतो. 399 रुपयाचा या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. यात दररोज 1.5 GB डाटा दिला जातो. यासोबतच तुम्हाला Amazon, Netflix आणि Disney Plus Hoststar या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सबस्क्रिप्शनदेखील देण्यात येते.