खुशखबर!! महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरांत Jio 5G सर्विस सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच 5G सेवा लाँच केली आहे. कंपनी आपल्या सेवेचा हळूहळू विस्तार करत असून आता कंपनीने देशभरातील आणखी 11 शहरात 5G सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना आता हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळेल. यापूर्वी राज्यातील मुंबई आणि पुण्यात Jio 5G सर्विस सुरु करण्यात आली होती.

jio ची ५जी सर्विस आधीच देशभरातील १३ शहरात सुरु आहे. त्यातच आता लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद आणि चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी याठिकाणी जिओने 5G सेवा करण्याची घोषणा केली आहे. या शहरातील यूजर्सना जिओ वेलकम ऑफर’ (Jio Welcome Offer) अंतर्गत आमंत्रित केले जाईल. त्यानंतर जिओ यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps पेक्षा जास्त वेगाने अमर्यादित डेटा मिळणार आहे.

Jio 5G Welcome Offer चा फायदा कसा घ्याल ?

Jio वेलकम ऑफर कंपनीच्या MyJio App या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. कंपनीने ५जी नेटवर्क उपलब्ध असलेल्या शहरातील यूजर्सला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी इनव्हाइट केले आहे. MyJio App तुम्हाला टॉपवर एक बॅनर मिळेल. ज्यामध्ये जिओ ५जी चा उल्लेख करण्यात आला आहे. या वर क्लिक केल्यानंतर I’m Interested चा ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करून तुम्ही Jio Welcome Offer साठी रजिस्टर करू शकता.