Jio आणि Airtel चे जबरदस्त प्लॅन; 300GB डेटासह Free मध्ये Netflix आणि प्राइम व्हिडिओची सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त इंटरनेट डेटा आणि मोफत OTT बेनेफिट्स वाल्या प्लॅनच्या शोधात असले तर प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी जिओ आणि एअरटेल तुम्हाला परवडेल अशा किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅन्स अंतर्गत तुम्हाला ३०० जीबीपर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगच्या सुविधेसह नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या OTT अॅप्सवर फ्री मध्ये प्रवेश दिला जात आहे. चला आपण जाणून घेऊया एअरटेल आणि जिओचे हे जबरदस्त प्लॅन्स….

1) एअरटेलचा 1199 रुपयांचा प्लान-

ग्राहकांना या प्लॅन अंतर्गत 150 GB डेटा मिळेल. त्याचबरोबर ऐड ऑन कनेक्शन्स साठी दर महिन्याला 30 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग सुद्धा करता येतील. प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 6 महिन्यांसाठी Amazon Prime चे मेम्बरशिप दिले जात आहे. याशिवाय डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शनही एका वर्षासाठी प्लॅनमध्ये दिले जात आहे. एवढेच नाही तर, जर तुमची इच्छा असेल तर एअरटेलचा हा 1199 चा प्लॅन नेटफ्लिक्स बेसिक देखील ऑफर करतो, ज्याला तुम्ही दरमहा ३०० रुपये अतिरिक्त देऊन किंवा ४५० रुपये अतिरिक्त देऊन प्रीमियम प्लॅनमध्ये रूपांतरित करू शकता.

2) एअरटेलचा 1499 रुपयांचा प्लॅन-

या प्लॅनची किंमत पाहूनच तुम्हाला कळेल की हा एअरटेलचा हा सर्वात महागडा पोस्टपेड प्लान आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 200 GB डेटा मिळेल. प्लॅनमध्ये अॅड-ऑन कनेक्शनला दरमहा 30 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनच्या मेम्बर ना ६ महिन्यांसाठी प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स स्टँडर्ड एक वर्षासाठी फ्री ऍक्सेस दिला जात आहे. यूजर्स जर त्यांची इच्छा असेल तर या नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनला 150 रुपये अधिक देऊन त्याचे प्रीमियम मध्ये रूपांतरित करू शकतात.

3) जिओचा 699 रुपयांचा प्लान

जिओच्या या स्वस्तात मस्त अशा प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 100 जीबी डेटा देत आहे. तसेच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. त्याच वेळी, कंपनी अतिरिक्त सिमला दरमहा 5 जीबी अतिरिक्त डेटा देते. Jio चा हा पोस्टपेड प्लान Netflix Basic आणि Amazon Prime वर फ्री ऍक्सेस देत आहे.

4) जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 300 जीबी डेटा दिला जात आहे. यासह तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड एसएमएस देखील करता येणार आहेत. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये नेटफ्लिक्स मोबाइल आणि अॅमेझॉन प्राइमची मोफत सदस्यता समाविष्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्लॅनच्या माध्यमातून मनोरंजनाचा चांगला लाभ घेऊ शकता.