Jio Bharat V2 Unlimited Calls | जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 28 GB डाटासह मिळणार फ्री कलिंग सर्व्हिस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Bharat V2 Unlimited Calls | रिलायन्स जिओ ही भारतातील टेलिकॉम कंपनीपैकी एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीने मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात एक नवीन प्रगती केलेली आहे. ती म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात गावोगावीत आता जीओ पोहोचले आहे. त्यामुळे मोबाईलच्या वापराची आता पद्धत बदलून गेलेली आहे. ही आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी देखील बनलेली आहे. जिओ त्यांच्या ग्राहकांना नेहमीच परवडणाऱ्या किमतीमध्ये नवनवीन ऑफर्स देत असतात. ज्याचा फायदा त्यांच्या ग्राहकांना होत असतो. आणि ग्राहक देखील त्यांच्याशी टिकून राहतात.

गेल्या वर्षी या कंपनीने 999 भारत v2 (Jio Bharat V2 Unlimited Calls)फोन लॉन्च केला होता. आता या कंपनीने याच फोनसाठी एक नवा प्रीपेड प्लॅन देखील आणला आहे. यामध्ये आता ग्राहकांना 28 जीबी डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे. आता हा प्लॅन काय आहे याचा फायदा नक्की कशाप्रकारे होईल हे आपण पाहणार आहोत.

काय आहे हा प्लॅन? | Jio Bharat V2 Unlimited Calls

आकाश अंबानी याने जिओ भारत फोनसाठी एक नवा प्लॅन आणलेला आहे. या प्लॅनची किंमत 230 रुपये एवढी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 जीबी डाटा मिळेल. त्याचप्रमाणे अनलिमिटेड वॉइज कॉलिंग मिळेल आणि 28 दिवसांसाठी 300 एसएमएस मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवसांसाठी असणार आहे. त्याचप्रमाणे जिओ सावन आणि जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रिप्शन देखील तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणार आहे.

आदानी देणार जिओला टक्कर

सध्या मार्केटमध्ये जिओची व्हॅल्यू देखील वाढलेली आहे. अशातच आता गौतम आदानी त्याची कंपनी मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. भारतामध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव 20 मे पासून सुरू होणार आहे. या संदर्भात त्यांना 18 मार्चला नोटीस देखील पाठवली होती. आता गौतम आदमी यांनी एका मीटिंगमध्ये स्पेक्ट्रम लिलावात सहभाग होण्याचे संकेत दिले होते. पण असे झाले तर अदानी 5g इंटरनेट सर्विसवर अधिकार प्राप्त करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु आदानीने जर यामध्ये एंट्री घेतली तर जिओसाठी एक खूप मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे जीओ त्यांच्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी सध्या नवनवीन प्लॅनच्या ऑफर देत आहे.