Jio Booster Plan : 251 रुपयांमध्ये 500 GB डेटा; Jio ने आणला स्वस्त रिचार्ज प्लॅन

Jio Booster Plan Air Fiber
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Booster Plan । प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओचे रिचार्ज स्वस्त असल्याने ग्राहकांची सुद्धा मोठी पसंती जिओला मिळत असते. आता सुद्धा जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला 251 रुपयांमध्ये 500GB डेटा वापरायला मिळतोय. मात्र जिओचा हा रिचार्ज प्लॅन मोबाईल साठी नव्हे तर AirFiber सेवेसाठी आहे. AirFiber अशी इंटरनेट सर्व्हिस आहे जी वायरलेस आहे.

काय फायदे मिळतील – Jio Booster Plan

Jio त्यांच्या AirFiber यूजर्सना दर महिन्याला 1TB हाय-स्पीड डेटा देते. पण हा डाटा संपला तर इंटरनेटचा वेग कमी होईल. म्हणून Jio ने काही “डेटा बूस्टर पॅक” तयार केले आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला अजून इंटरनेट पाहिजे असेल तर या बूस्टर प्लॅनद्वारे तुम्ही घेऊ शकता. याअंतर्गत कंपनीने ग्राहकांसाठी २ नवे प्लॅन जाहीर केले आहेत. त्यातील एका बूस्टर प्लॅनची ​​किंमत 101रुपये आहे तर दुसऱ्या प्लॅनची किमत 251 रुपये आहे. हे दोन्ही प्लान AirFiber आणि AirFiber Plus या दोन्ही सोबत काम करतील.

स्पीड किती असेल-

या दोन्ही रिचार्ज प्लॅनच्या (Jio Booster Plan) स्पीडबद्दल बोलायचे झाले तर Jio 101 रुपयांचा प्लॅन आणि Jio 251 रुपयांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला तुमच्या बेस प्लान प्रमाणेच स्पीड मिळेल. 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. तर 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून 500 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. परंतु याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कि, हा एक डेटा प्लान आहे, ज्यामुळे तुम्हाला या पॅकसह व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळणार नाही म्हणजेच तुम्ही कोणाला कॉल वगैरे करू शकणार नाही.

कसा करावा रिचार्ज-

जिओच्या या “डेटा बूस्टर पॅकचा रिचार्ज करण्यासाठी तुम्ही MyJio ॲप किंवा Jio.com वर जाऊ शकता. इथेही हे लक्षात ठेवा कि या दोन्ही प्लॅन वर तुम्हाला वेगळा GST शुल्क भरावा लागेल.