नववर्षासाठी Jio ने आणला जबरदस्त रिचार्ज प्लॅन ! स्वस्तात मिळणार दररोज 2.5 जीबी 5G डेटा आणि बरेच काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Recharge Plan : सध्या वर्ष 2023 संपत आले असून नववर्षापूर्वी जिओने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता जिओ ग्राहकांना स्वस्तात एक वर्षासाठी रिचार्ज प्लॅन देत आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी पैसे देऊन दररोज 2.5 जीबी 5G डेटाचा लाभ घेऊ शकता.

कंपनीची ही नवीन वर्ष ऑफर 365 दिवसांच्या वैधतेसह लोकप्रिय प्लॅनसह दिली जात आहे. या प्लानची किंमत 2999 रुपये आहे. या प्लॅनच्या ग्राहकांना नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये 24 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल.

तसेच प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. कंपनीचा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएससह येतो. प्लॅनमध्ये कंपनी Jio TV सोबत Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत एक्सेस देत आहे.

3227 रुपयांचा प्लॅन जाणून घ्या

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 3227 रुपयांचा एक उत्तम प्लॅन देखील आहे. हा प्लॅन एका वर्षासाठी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. प्लॅनमध्ये कंपनी Jio TV आणि Jio Cinema ला मोफत एक्सेस देत आहे. तसेच या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये कंपनी दररोज 2 GB दराने 730 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.

3178 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी हॉटस्टार

जर तुम्हाला डिस्ने+ हॉटस्टार मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास, जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema चा मोफत एक्सेस मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. यामध्ये देखील पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा दिला जात आहे. 365 दिवसांची वैधता असलेला हा प्लॅन दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग लाभांसह येतो. अशा प्रकारे ग्राहकांसाठी हा एक उत्तम प्लॅन असून तुम्ही नववर्षात या प्लानचा लाभ घेऊ शकता.