JIO : चा जबरदस्त धमाका ! फक्त 601 रुपयांमध्ये मिळवा संपूर्ण वर्षभर अनलिमिटेड 5G इंटरनेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

JIO : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक लै भारी आणि खिशाला परवडणारी इंटरनेट सेवा आणली आहे. केवळ ₹601 मध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट वापरण्याची मुभा मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये कोणतीही डेटा लिमिट नाही म्हणजेच तुम्ही जितका हवा तितका डेटा वापरू शकता, तोही पूर्ण वेगाने आणि अखंड सेवा अनुभवत चला तर मग जाणून घेऊया…

काय आहे ₹601 चा खास प्लान? (JIO)

Jio चा हा 601 रुपयांचा प्लान त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांना वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय 5G इंटरनेटचा वापर करायचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १२ महिन्यांचे 5G अपग्रेड वाउचर्स दिले जातात. हे वाउचर्स वापरून ग्राहक त्यांच्या चालू असलेल्या इंटरनेट प्लानवर अनलिमिटेड 5G डेटा सक्रिय करू शकतात. या वाउचर्समुळे ग्राहकांना नव्याने दर महिन्याला 5G प्लान खरेदी करण्याची गरज भासत नाही. याशिवाय हा प्लान गिफ्ट म्हणून देखील दिला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना फायदेशीर इंटरनेट सेवा देता येते.

पण काही अटी पाळणे गरजेचे…

या प्लानचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, ग्राहकाकडे 5G फोन असणे गरजेचे आहे.जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत नसेल, तर तुम्ही या प्लानचा उपयोग करू शकणार नाही. त्याचप्रमाणे, तुमच्या परिसरात Jio चा 5G नेटवर्क उपलब्ध असणेही आवश्यक आहे.अन्यथा, सेवा मिळणार नाही.

त्याचबरोबर, 601 रुपयांचा हा प्लान बेस प्लानवर अपग्रेड स्वरूपात काम करतो. म्हणजेच, ग्राहकाने स्वतंत्रपणे एक डेटावाला बेस प्लान घेतलेला असावा. हा प्लान किमान 1.5GB/दिवस डेटा असलेला असावा, म्हणजेच ग्राहकाचा सध्याचा रिचार्ज प्लान सक्षम असणे गरजेचे आहे. एकदा बेस प्लान सक्रिय झाल्यानंतर ग्राहक 5G वाउचर्स रिडीम करू शकतात.

कोणासाठी आहे हा प्लान?

हा प्लान प्रामुख्याने हाय डेटा युजर्स, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेट स्ट्रीमिंग करणारे युजर्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच, वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज करून नंतर वारंवार रिचार्ज करण्याची गरज न पडल्यामुळे, वेळ आणि पैशांची बचतही होते.

जिओकडून डिजिटल भारताची वाटचाल…

Jio ने या प्लानद्वारे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारतात दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सेवा प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आवाक्यात आणणे शक्य आहे. 601 रुपयात वर्षभर 5G सेवा देऊन कंपनीने टेलिकॉम स्पर्धेत आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे.रिचार्ज करण्यापूर्वी खात्री करा की तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि तुम्ही अशा परिसरात आहात जिथे Jio चे 5G नेटवर्क उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी Jio च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा Jio अ‍ॅप वापरा.