स्वस्तात खरेदी करा Fridge; Jio ने आणली खास ऑफर

Jio offer on refrigerator
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या तडाख्याने सर्वच जण हैराण झाले आहेत… कडक उकाड्यामुळे थंड पाण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी फ्रिज खरेदीदार ग्राहकांची लगबल सुरु आहे. नवीन फ्रिज खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळतेय,… तुम्ही सुद्धा यंदाच्या उन्हाळ्यात नवीन फ्रिज खरेदी करणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. ई-कॉमर्स वेबसाईट JioMart वर सध्या डिजी उत्सव सेल सुरू आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहक अगदी कमी किमतीत नवा फ्रिज खरेदी करू शकतात. २४ मार्च ते २६ मार्च पर्यंत तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता. जीवोच्या या सेल मध्ये नेमक्या कोणकोणत्या फ्रिज वर किती रुपयांचा डिस्काउंट आहे ते आपण पाहुयात…

JioMart च्या सेल नुसार, बाजारात ४१,४९० रुपयांना मिळणारा हायर २६८ एल फ्रॉस्ट फ्री टॉप माउंट २ स्टार रेफ्रिजरेटर जिओमार्टवर ३९% सूटसह फक्त ₹२४,९९० मध्ये उपलब्ध आहे. या फ्रिज ची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, ५ इन १ कन्व्हर्टिबल मोड, ट्विन एनर्जी सेव्हिंग मोड, टर्बो आयसिंग, टफन ग्लास शेल्फ, होम इन्व्हर्टरशी कनेक्शन आणि रिसेस हँडल सारख्या फीचर्सने हा फ्रिज सुसज्ज आहे…

यानंतर गोदरेज २३८ एल ३ स्टार फ्रॉस्ट फ्री डबल डोअर रेफ्रिजरेटर, ज्याची किंमत बाजारात ३२,५९०. रुपये आहे, तो जिओमार्टवर २७% सूटसह फक्त २३,४९० रुपयात उपलब्ध आहे. यात नॅनो शील्ड टेक्नॉलॉजी, कूल बॅलन्स टेक्नॉलॉजी, २४ दिवसांसाठी फार्म फ्रेशनेस, अॅडव्हान्स्ड इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी, मूव्हेबल आइस मेकर आणि २४ तासांसाठी कूलिंग रिटेन्शन अशी वैशिष्ट्ये आहेत.

LG २७२ L २ स्टार डबल डोअर रेफ्रिजरेटरची मूळ किंमत ४०,७९९.०० रुपये आहे, मात्र JioMart वर तुम्ही हा फ्रिज फक्त ३१,९९० रुपयांत खरेदी करू शकता. ग्राहकांना या फ्रिजवर २१% डिस्काउंट उपलब्ध आहे. या फ्रिजचे खास फीचर्स मध्ये स्मार्ट डायग्नोसिस, टफन ग्लास शेल्फ आणि ऑटो स्मार्ट कनेक्ट यांचा समावेश आहे.

व्होल्टास बेको २३० एल १ स्टार फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, ज्याची बाजारातील किंमत ३६,९९०.०० रुपये आहे, ती जिओमार्टवर फक्त २०,७९० रुपयांत उपलब्ध आहे… म्हणजेच ग्राहकांना या फ्रिजवर तब्बल ४३% डिस्काउंट देण्यात आलाय. २३० लिटर क्षमता, निओफ्रॉस्ट ड्युअल कूलिंग, स्टॅबिलायझर फ्री ऑपरेशन, एलईडी इल्युमिनेशन आणि अॅडजस्टेबल टफन ग्लास शेल्फ सारखी फीचर्स तुम्हाला या फ्रिज मध्ये मिळतील.