Jio New Recharge Plans | Jio ने आणले 3 स्वस्त रिचार्ज प्लॅन; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक फायदे

Jio New Recharge Plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio New Recharge Plans | आजकाल टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्चाचे प्लॅन खूप महाग केले आहेत. त्यानंतर अनेक ग्राहकांनी त्यांचे सीम पोर्ट करून सरकारी बीएसएनएल कंपनीकडे ते वळलेले आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्याच्या कालावधी बीएसएनएलने जवळपास 36 लाख नवीन युजर जोडलेले आहेत, तर एअरटेल आणि जिओनी त्यांचे अनेक युजर्स कमावलेले आहे.

परंतु आता या खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांचे ग्राहक परत मिळवण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन लॉन्च करत आहेत. जिओनी देखील अनेक प्लॅन ऑफर केलेले आहेत. जे तुम्हाला अत्यंत स्वस्त करत मिळतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅन बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्त फायदा होणार आहे.

जिओचा 336 दिवसांचा प्लॅन | Jio New Recharge Plans

सध्या जिओ नवनवीन ग्राहकांना जोडण्यासाठी अनेक प्लॅन लॉन्च करत आहेत. अशातच त्यांनी आणखी एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे. जिओचा हा प्लॅन 1199 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला 336 दिवसाची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये महिन्याला किंवा 150 रुपये एवढा खर्च येणार आहे. यामध्ये तुम्ही संपूर्ण भारतभर अनलिमीटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. तसेच 24 जीबी डेटा देखील तुम्हाला मिळणार आहे. हा डेटा तुम्ही संपूर्ण व्हॅलिडीटी काळात वापरू शकता. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला 3600 फ्री एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा ॲक्सिस देखील तुम्हाला फ्री दिला जाणार आहे. यामध्ये युजर्सला अनेक फायदे मिळणार आहे.

जिओचा 479 रुपयांचा प्लॅन

जिओनी नवीन 479 रुपयांचा प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा देखील यामध्ये लाभ घेता येणार आहे. जर तुम्हाला जास्त इंटरनेटची गरज नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला प्लॅन आहे. तुम्हाला कमी किमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा देखील पर्याय यामध्ये मिळत आहे.

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन

जिओचा 189 रुपयांचा प्लॅन हा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 2 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ज्या लोकांना इंटरनेट पेक्षा कॉलिंग जास्त लागते. त्यांच्यासाठी हा आपल्याला अत्यंत फायद्याचा प्लॅन असणार आहे.