हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर कोणी म्हटलं कि तुमच्या घरातील TV कम्प्युटर मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो तर तुम्ही वेड्यात काढाल…. हे कस शक्य आहे असं म्हणाल.. परंतु तंत्रज्ञानाच्या या युगात हे पण शक्य झालं आहे. मुकेश अंबानी यांच्या Jio ने ही किमया करून दाखवली आहे. रिलायन्स जिओने पूर्णपणे नवीन Jio PC लाँच केला आहे. JioPC ही एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप सेवा आहे जी आपल्या जिओ सेट टॉप बॉक्स डिव्हाइसद्वारे चालते. ज्याचा खर्च अवघा ४०० रुपये आहे. त्यामुळे तुम्हीही जर नवीन कम्प्युटर खरेदी करणार तर थांबा …. त्याआधी जिओ ची हि सुविधा जाणून घ्या…
काय आहे Jio PC?
Jio PC हा क्लाउड आधारित व्हर्च्युअल डेस्कटॉप प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मदतीने तुम्ही घरातील किंवा ऑफिसमधील कोणत्याही टीव्ही स्क्रीनला काही मिनिटांत हाय एंड पर्सनल कॉम्प्युटरमध्ये रूपांतरित करू शकता. ज्या वापरकर्त्यांकडे JioFiber किंवा Jio AirFiber कनेक्शन आहे त्यांना Jio-PC वापरण्यासाठी फक्त एक अतिरिक्त मासिक प्लॅन घ्यावा लागेल. तर नवीन वापरकर्ते ही सेवा एका महिन्यासाठी मोफत वापरू शकतात. JioPC विविध क्षमता आणि प्लॅनमध्ये उपलब्ध सब्सक्रिप्शन सेवा म्हणून ऑफर केली जाते.
खास बाब म्हणजे Jio PC भारताचे असे पहिले कम्युटर आहे, ज्यात ‘पे-एज-यू-गो’ मॉडल आहे. म्हणजे जितका तुमचा वापर, तितकाच खर्च हा त्यासाठीचा मंत्र आहे. कंपनीने या सेवेसाठी कोणताही लॉक-इन कालावधी निश्चित केलेला नाही. या एकाच प्लॅनमुळे, वापरकर्त्यांना कोणताही देखभाल खर्च सहन करावा लागणार नाही किंवा त्यांना कोणतेही महागडे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त प्लग इन करून आणि साइन अप करून ही संगणकीय सेवा वापरण्यास सुरुवात करू शकता. जिओचे म्हणणे आहे की ज्यांना वेब ब्राउझ करायचे आहे, प्रोग्रामिंग करायचे आहे, ऑनलाइन लर्निंग करायचे आहे, डिझाइनिंग करायचे आहे.
खर्च किती?
जिओ ही सुविधा फक्त ४०० रुपयांच्या मासिक प्लॅनवर देत आहे. म्हणजेच दर महिन्याला फक्त ४०० रुपये खर्च करून तुम्ही तुमचा टीव्ही कॉम्प्युटर मध्ये बदलू शकता. यासह तुम्हाला सर्व एआय टूल्स, अॅप्लिकेशन्स आणि ५१२ जीबी पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे. जर तुम्हाला वार्षिक प्लॅन घ्यायचा असेल तर तुमचे पैसे आणखी वाचतील. कारण हा प्लॅन 4,599 रुपयांत उपलब्ध असून यामध्ये कंपनी 3 महिन्यांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देत आहे. म्हणजेच काय तर 12 महिने आणि त्यासोबत 3 महिने अतिरिक्त म्हणजे 15 महिने तुम्ही या सेवेचा आनंद घेऊ शकता.