Jio Rail App | भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. परंतु जिओने त्यांचे वर्चस्व स्थापित केलेले आहेत. जिओने त्यांचे एक ॲप देखील लॉन्च केलेले आहे. या ॲपचे नाव आहे- Jio Rail App. नावावरूनच तुम्हाला हे स्पष्ट झाले असेल की, ते रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच, ते लोकांना कन्फर्म ट्रेन तिकीट मिळविण्यात मदत करते.
रेल्वेचे तिकीट बुक करा | Jio Rail App
परंतु प्रत्येकाला च हे ॲप वापरता येत नाही. जिओ (Jio Rail App) फोनसाठी हे ॲप आहे. इथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. तुम्ही या ॲपच्या मदतीने ट्रेनचे तिकीट ऑनलाईन देखील बुक करू शकता. यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या रेल्वेचे तिकीट बुक करू शकता.
रेल्वेच्या तिकीट बुकिंग व्यतिरिक्त इतर अनेक ऑप्शन देखील युजर्सला देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला या ॲपमध्ये पीएनआर स्थितीबद्दल देखील माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे ट्रेनच्या वेळी पासून सुरु होणारी प्रत्येक माहिती तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता येईल.
तिकीट बुक कसे करायचे ? | Jio Rail App
सर्वप्रथम तुम्हाला जिओ फोनमध्ये उपलब्ध असलेल्या ‘जिओ रेल ॲप’वर जावे लागेल. येथे गेल्यावर तुम्हाला स्टेशन निवडावे लागेल. म्हणजेच तुम्हाला कोणत्या स्टेशनवरून कोणत्या स्टेशनपर्यंत प्रवास करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारीख निवडावी लागेल. एकदा आपण सर्वकाही निवडल्यानंतर, आपल्याला ट्रेन आणि सीट देखील निवडावी लागेल.