Jio Recharge Plan: Jio ची धमाकेदार मेगाहिट ऑफर ; ग्राहकांना मिळणार जास्त फायदे

0
3
Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Recharge Plan – रिलायन्स जिओ नेहमी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेवा प्रदान करत असते. आता पुन्हा एकदा त्यांनी ग्राहकांसाठी एक आकर्षक मेगाहिट ऑफर जाहीर केली आहे. या योजनांमध्ये अमर्यादित कॉल, इंटरनेट, एसएमएस आणि जिओ टीव्हीसह विविध सेवा स्वस्त दरात दिला आहेत. त्याचसोबत ग्राहकांना 200 दिवसांसाठी 500 जीबी डेटा (दररोज 2.5 जीबी), अमर्यादित कॉल्स आणि एसएमएस, तसेच 2150 किमतीचे पार्टनर कूपन दिले जात आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

जिओचा एका वर्षाचा प्लॅन (Jio Recharge Plan) –

जिओने 3,599 च्या वार्षिक प्लॅनमध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटी दिलेली आहे. या सोबतच 5 जी डेटा, अमर्यादित कॉल्स आणि JioTV, JioCloud, JioCinema चा मोफत अ‍ॅक्सेस दिला आहे. तसेच, 3,999 च्या प्लॅनमध्ये फॅनकोड सबस्क्रिप्शनचा अतिरिक्त लाभ मिळतो. त्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहत नाही. या ऑफरचा मुख्य उद्देश जिओला सर्वोत्तम सेवा प्रदाता म्हणून प्रस्थापित करणे आणि ग्राहकांना दीर्घकालीन कनेक्टिव्हिटी, जलद इंटरनेट व बचतीचे फायदे मिळवून देणे आहे.

ग्राहकांना जास्त फायदा –

या ऑफरचा ग्राहकांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. स्वस्त दरात दमदार सेवा सुविधांचा अनुभव या प्लॅनमध्ये मिळणे आहे. दीर्घकालीन व्हॅलिडिटी , अमर्यादित सेवा, आणि अतिरिक्त लाभामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्जची करण्याची गरज भासणार नाही. फॅनकोड सबस्क्रिप्शन आणि पार्टनर कूपनमुळे मनोरंजन आणि बचतीचा दुहेरी लाभ मिळतो.