Jio Recharge Plan: Jio चा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; दररोज 1.5GB डेटा अन फ्री JioHotstar सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Recharge Plan – रिलायंस जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी काही नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना नवीन OTT प्लॅटफॉर्म Jio Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. हे JioCinema आणि Disney+Hotstar चे एकत्रीकरण करून नवीन OTT प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टार तयार केले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची लाइव्ह स्ट्रीमिंग देखील जिओहॉटस्टारवर होत आहे. जिओ ग्राहकांना अशा अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMS सारख्या सुविधांचा लाभ मिळत आहे.

299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) –

रिलायंस जिओच्या या रिचार्ज प्लॅनची (Jio Recharge Plan) व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे, म्हणजेच ग्राहकांना एकूण 42GB डेटा मिळू शकतो. तसेच डेटा संपल्यावर स्पीड 64 Kbps वर कमी होते . त्याचसोबत जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा दिली जाते. त्याचप्रमाणे, यूझर्सला दररोज 100 SMS देखील मिळतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी Jio Hotstar Mobile/TV सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. तसेच, या रिचार्ज पॅकमध्ये 50GB मोफत JioAICloud स्टोरेज देखील उपलब्ध आहे. जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅन एकदाच मिळतो आणि तो एक मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

जिओहॉटस्टारच्या फायद्याचा उपयोग –

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जिओच्या (Jio Recharge Plan)या महिन्याच्या रिचार्ज प्लॅनचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना जिओहॉटस्टारच्या फायद्याचा उपयोग दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात घेण्यासाठी प्लॅन संपल्यानंतर 48 तासांच्या आत रिचार्ज करणे बंधनकारक आहे. तसेच जिओहॉटस्टार/जिओ AICloud फायदे मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या जिओ नंबरसोबत लॉगिन करणे आवश्यक आहे.