Jio Recharge Plan : Jio ची स्पेशल ऑफर!! आज रिचार्ज करा अन भरपूर फायदे मिळवा

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Recharge Plan – मुकेश अंबानी यांच्या जियोकडून यूजर्सना मोठी भेट देण्यात आली आहे. जियोने काही रिचार्ज प्लॅन्सवर आकर्षक फायदे जाहीर केले आहेत. आज 7 जानेवारी 2025 रोजी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना जास्त व्हॅलिडिटी , अनलिमिटेड डेटा, वॉइस कॉलिंग, आणि OTT सब्सक्रिप्शन यासारख्या सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या प्लॅनमुळे ग्राहकांना कमी किमतीत जास्त फायदे दिले जाणार आहेत. तर चला या प्लॅनबदल सर्व माहिती जाणून घेऊयात.

2025 रुपयांचा खास प्लॅन (Jio Recharge Plan ) –

जिओने 2025 रुपयांच्या खास प्लॅनची घोषणा केली आहे, ज्यात ग्राहकांना 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये 500 GB डेटा दिला जातो, ज्यामुळे ग्राहकांना दररोज 2.5 GB डेटा वापरण्याची सुविधा मिळते. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच जिओ सिनेमा सब्सक्रिप्शनही या प्लॅनमध्ये मोफत दिले जाते, ज्यामुळे ग्राहकांना लोकप्रिय चित्रपट आणि शो बघण्यासाठी अतिरिक्त लाभ मिळतो. एकंदर, हा प्लॅन जास्त कालावधीसह उत्कृष्ट डेटा, कॉलिंग आणि मनोरंजन सुविधांचा उत्तम पर्याय आहे.

जिओचा 899 रुपयांचा प्लॅन –

जिओचा 899 रुपयांचा प्लॅन (Jio Recharge Plan) एक चांगला बजेट ऑप्शन आहे, जो कमी खर्चात जास्त फायदे देतो. या प्लॅनमध्ये 200 GB डेटा उपलब्ध आहे, तसेच दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळतो, जो इंटरनेट वापरासाठी पुरेसा असतो. यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा देखील आहे, त्यामुळे कॉलिंगसाठी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. तसेच, दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा आणि जिओ सिनेमा सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन –

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन दीर्घ व्हॅलिडिटी आणि भरपूर डेटा प्रदान करणारा एक अत्यंत फायदेशीर प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 98 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते, ज्यामुळे ग्राहकांना जास्त कालावधीसाठी सेवा मिळतात . यामध्ये 196 GB डेटा दिला जातो, ज्यामुळे दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे ग्राहकांना कॉलिंग आणि msg सेवा स्वतंत्रपणे वापरता येते. जिओ सिनेमा सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळते, ज्यामुळे ग्राहकांना मनोरंजनासाठी एक अतिरिक्त फायदा मिळतो.

ग्राहकांना फायदेशीर –

या व्यतिरिक्त जियोकडून अनेक आकर्षक प्लॅन्स ऑफर केले जात आहेत. प्रत्येक प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT सेवांचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. कमी बजेटमध्ये जास्त व्हॅलिडिटी हवी असेल, तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.