Jio Recharge Plan: Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; ‘या’ प्लँटफॉर्मसाठी मिळणार मोफत सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Recharge Plan – रिलायन्स जिओ (Reliance Jio) नेहमी आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी विविध रिचार्ज प्लॅनची घोषणा करत असते. रिलायन्स जिओ, भारतातील सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर असून , त्यांनी ग्राहकांसाठी एक नवीन अन फायदेशीर रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. जिओचे 1,049 रुपयांचे नवीन रिचार्ज प्लॅन ग्राहकांना विविध आकर्षक फायदे देत आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग , एसएमएस , डेटा इत्यादी सेवा पुरवत आहे. तर हा प्लॅन कसा आहे अन त्याचे अजून कोण कोणते फायदे मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात.

ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोफत वापर (Jio Recharge Plan)

जीओच्या 1,049 रुपयाच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस/दिवस, आणि दररोज 2 जीबी डेटा पुरवला जातो, ज्याचा लाभ ग्राहक 89 दिवसांपर्यंत घेऊ शकतात. तसेच, या प्लॅनमध्ये 50 जीबी JioAI Cloud स्टोरेज आणि 90 दिवसांसाठी JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनद्वारे ग्राहकांना JioTV अँपद्वारे Zee5 आणि SonyLiv या दोन प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोफत वापर देखील मिळणार आहे. तसेच जिओने आपल्या ग्राहकांना एक विशेष ऑफर दिली आहे, ज्यात JioHotstar चा फ्री सबस्क्रिप्शन 15 एप्रिल 2025 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
हा प्लॅन ग्राहकांसाठी एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरू शकतो, खासकरून जे लोक ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध शो आणि चित्रपट पाहायला आवडतात.

ग्राहकांना फायदेशीर –

रिलायन्स जिओ (Jio Recharge Plan) आणि इतर प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर नेटवर्क कव्हरेज मॅप्स उपलब्ध केले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या निर्देशानुसार, युजर्स आता त्यांच्या क्षेत्रातील नेटवर्क उपलब्धतेबद्दल अधिक सहजपणे माहिती मिळवू शकतात. जिओचा हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना आकर्षित करणार असून, ओटीटी सामग्रीवर थोड्या पैशात अधिक मनोरंजन मिळवण्याचा उत्तम मार्ग प्रदान करतो.