हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स जिओ ही सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्सने ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे काही प्लॅन्स जाहीर केलेले आहेत. त्यातील त्यांचा 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन चांगलाच लोकप्रिय होत आहे. या प्लॅनची वैधता 3 महिन्यांची आहे. आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोण कोणत्या सुविधा मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊया.
जिओचा या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत ही 479 एवढी आहे. म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 160 रुपये खर्च येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉलिंग, डेटा सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि इतर सुविधा देखील मिळणार आहे. हा प्लॅन जिओने सादर केलेला आहे. या 479 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच स्थानिक आणि एसटीडी कॉल कुठल्याही नेटवर्कवर त्यांना मोफत करता येत आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी डेटा प्रदान केला जाणार आहे. आणि डेटा संपल्यानंतर तुम्हाला हे स्पीड 64 केबीपीएस एवढे होईल.
84 दिवसांच्या कालावधीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 हजार मेसेज मोफत मिळणार आहे. असेच मोफत जिओ ॲप जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा 84 दिवसांचा प्लॅन करू शकता. 84 दिवसांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्त डेटा प्रधान केला जात नाही. परंतु यामध्ये आणखी एक प्लॅन जाहीर केला आहे. तो म्हणजे तुम्ही 1029 रुपयांचा रिचार्ज केला, तर त्याची वैधता देखील 84 दिवसाची असणार आहे. यामध्ये तुम्हाला 168 जीबी मोफत डेटा देखील मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा वापरता येणार आहे.
त्याचप्रमाणे या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंगचा अनुभव घेता येणार आहे. आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळणार आहे. यासोबतच जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि इतर सुविधा देखील मिळणार आहेत. इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जिओने त्यांच्या या ऑफर्स जाहीर केलेल्या आहेत.