हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plans । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. ग्राहकांना स्वस्तात मस्त रिचार्ज कसा मिळेल याकडे कंपनीचा कल असतो.. तसेच नवनव्या ट्रेंड नुसार ग्राहकांना परवडेल अशा किमतीत जिओ रिचार्ज प्लॅन आणत असते. आताही भारतातील वेगाने वाढणाऱ्या क्लाउड गेमिंग मार्केटमध्ये आपला दबदबा ठेवण्यासाठी जिओने ५ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. यातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन अवघ्या ४८ रुपयांचा आहे, तर सर्वात महागडा प्लॅन ५४५ रुपयांना आहे.
जिओने हे ५ प्लॅन्स विशेषत: गेमर्ससाठी लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये काही विशेष ऑफर्स आहेत, जसे की Jio Cloud Games साठी मोफत सब्स्क्रिप्शन आणि इतर Jio अॅप्सचा समावेश…. कोणत्याही महागड्या हार्डवेअरची आवश्यकता न पडता यूजर्सचा हाय क्वालिटीचे कन्सोल-ग्रेड गेमिंग सर्व डिव्हाइसेस आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध करून देणे हा या प्लॅन (Jio Recharge Plans) मागच्या मूळ उद्देश आहे.
४८ रुपयांचा प्लॅन-
जिओ चा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये १० MB डेटा मिळतो आणि हा प्लॅन ३ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. यामध्ये पॅकच्या व्हॅलिडीटी कालावधीसाठी JioGames Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.
९८ रुपयांचा प्लॅन- Jio Recharge Plans
जिओ चा ९८ रुपयांचा प्लॅन सात दिवसांच्या जिओगेम्स क्लाउड अॅक्सेससह येतो. यामध्ये सुद्धा ४८ रुप्यांप्रमाणेच १० MB डेटा मिळतो. मात्र व्हॅलिडिटी जास्त असल्याने या प्लॅन किंमत थोडी जास्त आहे.
२९८ रुपयांचा प्लॅन-
२९८ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांसाठी JioGames Cloud चे सबस्क्रिप्शन देतो. या प्लॅन मध्ये ३GB इंटरनेट चा लाभ घेता येतो. पण ९८ रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, हे फक्त डेटा-ओन्ली व्हाउचर आहे आणि ते सक्रिय प्रीपेड प्लॅनसह वापरता येते.
४९५ रुपयांचा प्लॅन-
४९५ रुपयांच्या प्लॅन मध्ये दररोज १.५GB डेटा आणि ५GB बोनस डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. त्याकाळात JioGames Cloud अॅक्सेस, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलसह JioCinema, JioTV आणि JioAICloud सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येतो.
५४५ रुपयांचा प्लॅन
सर्वात बेस्ट आणि सर्व हौसमौज पूर्ण करणारा असा हा प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये ४९५ रुपयांच्या प्लॅन मध्ये जे जे आहे तेच आहे.. परंतु महत्वाची गोष्ट जी या प्लॅनला वेगळी ओळख देते ती म्हणजे ५४५ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळत आहे ते सुद्धा ५ जी .. त्यामुळे गेमिंग आणि स्ट्रीमिंग अनुभव जास्तीत जास्त वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हा रिचार्ज प्लॅन सर्वात बेस्ट पर्याय ठरेल.




