बाजारात येणार Jio चा Smart TV?? Sony, LG चं टेंशन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंपापासून ते मोबाईल पर्यंत सर्वच क्षेत्रात आपले हातपाय पसरून देदीप्यमान यश मिळवलेली रिलायंस इंडस्ट्री लवकरच स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहे असं दिसतंय. कारण एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम Jio TV OS ची चाचणी करत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असून सॅमसंगच्या टिझेन ओएस आणि एलजी वेबओएसशी स्पर्धा करेल. त्यामुळे ग्राहकांना लवकरच बाजारात Jio चा Smart TV बघायला मिळू शकेल.

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी Google सोबत भागीदारीत Jio TV OS ची चाचणी करत आहे. एका अहवालानुसार, कंपनीच्या एका कार्यकारिणीने सांगितले आहे की Jio TV OS एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असेल, जे डेव्हलपर्सना स्मार्ट टीव्ही आणि इतर कनेक्टेड उपकरणांसाठी ऑप्टिमाइझ ॲप्स तयार करण्यास परवानगी देईल. याशिवाय, कंपनी Jio TV OS साठी कोणतेही परवाना शुल्क आकारणार नाही . यामुळे छोटे उत्पादक Jio TV OS चा सहज अवलंब करू शकतात. त्यामुळे भारतीय स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये स्पर्धा झपाट्याने वाढणार आहे. जिओ टीव्ही लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची चर्चा इथूनच सुरू झाली आहे.

स्मार्ट टीव्हीच्या मार्केटमध्ये जिओच्या एंट्री नंतर एलजी, सोनी सारख्या स्मार्ट टीव्ही कंपन्यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे Redmi, Realme सारख्या चिनी कंपन्या भारतातील स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये आधीपासूनच आपलं बस्तान बसवून आहेत आणि अतिशय कमी किमतीत ग्राहकांना टीव्ही उपलब्ध करून देत आहेत. मात्र जिओ टीव्हीच्या एन्ट्रीमुळे ग्राहकांना भारतीय कंपनीचा पर्यायही मिळेल