Jio Special Recharge Offer | Jio देत आहे तब्बल 50 दिवस मोफत इंटरनेट अन् बऱ्याच सुविधा; कसे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिओ ही भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील एक सर्वोच्च कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत त्यांच्या ग्राहकांना अनेक रिचार्ज ऑफर्स दिलेल्या आहेत. या कंपनीचे 44 कोटींहून अधिक युजर्स भारतात आहे. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी तसेच त्यांना टिकवून ठेवण्यासाठी नेहमी नवनवीन ऑफर घेऊन येत असते. तुम्ही देखील जिओचे (Jio Special Recharge Offer) ग्राहक असाल आणि तुम्ही एक चांगला रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण जिओ कंपनीने तुमच्यासाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये जिओ तुम्हाला तब्बल 50 दिवस मोफत इंटरनेट देत आहे. IPL च्या पार्श्वभूमीवर जिओने (Jio Special Recharge Offer) ही एक योजना आणलेली आहे. तुम्ही जर क्रिकेटचे शौकीन असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आता याचा फायदा नक्की कसा घ्यायचा याबद्दल माहिती जाणून घेऊया.

तुम्ही जर JIO Air Fiber किंवा Jio Fiber चे ग्राहक असाल, तर तुम्हाला 50 दिवस मोफत इंटरनेटचा लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार आहे. परंतु यासोबत जिओने काही अटी ठेवलेल्या आहेत. कंपनीने ही सेवा आपल्या jio true 5G युजर्ससाठी लॉन्च केली आहे. एवढेच नाही तर तुमच्या कनेक्शनवर तुम्ही दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ 5G नेटवर्क वापरत असाल, तरी देखील तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता

या मोफत इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 599 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करावा लागणार आहे. यामध्ये ग्राहकांना 6 किंवा 12 महिन्याचा रिचार्ज करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचा फायदा घ्या.

Jio Air Fiber 599 रुपयांच्या प्लॅनचे फायदे | Jio Special Recharge Offer

आहे ज्यामध्ये वापर करताना 30 दिवसांच्या वैद्यतेसह ते 30 एमबीबीएस स्पीड इंटरनेट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 100 जीबी डाटा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स जिओच्या या पॅकमध्ये ग्राहकांना 550 हून अधिक टीव्ही चॅनल्स मोफत प्रवेश मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला डिज्नी प्लस, सोनी लिव, झी फाईव्ह यांचे सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे.