JioCoin : अंबानींची क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रात एंट्री? JioCoin ची तुफान चर्चा

0
1
JioCoin
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । JioCoin – भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच नाव डोळ्यासमोर येत. यांच्या नेतृत्वाखालील Jio Platforms ने अलीकडेच इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनी Polygon Labs सोबत महत्त्वपूर्ण भागीदारीची (partnership)घोषणा केली आहे. यामुळे, डिजिटल क्रांतीमध्ये एक नवीन पाऊल टाकताना, JioCoin नावाचे एक डिजिटल टोकन भारतीय बाजारात आणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

इंटरनेटवर तुफान चर्चेचा विषय –

JioCoin सध्या इंटरनेटवर तुफान चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर युजर्स JioCoin चे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत, मात्र कंपनीकडून या टोकनच्या कार्यप्रणालीबद्दल अधिकृत माहिती अजूनही आलेली नाही. बिटिनिंगचे CEO काशिफ रझा यांनी याबद्दलची माहिती सादर केली आहे, ज्यामुळे JioCoin ची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

JioCoin चे प्रमुख आकर्षण –

JioCoin चे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचा वापर मोबाइल रिचार्ज, रिलायन्स गॅस स्टेशनवरील गॅस भरण्यासाठी आणि इतर सेवांसाठी होऊ शकतो. JioCoin वापरून युजर्स Web3 वॉलेटमध्ये टोकन्स साठवून विविध ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. युजरच्या अॅप्समध्ये कामानुसार JioCoin ची कमाई होईल, जेणेकरून ते जास्त फायदा घेऊ शकतील.

Web3 तंत्रज्ञानाचा समावेश (JioCoin)-

Reliance Jio आणि Polygon च्या सहकार्याने, JioCoin प्रोग्राममध्ये Web3 तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे डिजिटल वॉलेट्स, क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर वाढू शकतो. पण , जिओकॉइनबाबत (JioCoin) कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे याच्या वापराबाबत अजून अनेक शंका आहेत.

नवे डिजिटल टोकन –

JioCoin च्या लॉन्चच्या वेळी, भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत कडक नियमनाची चर्चा सुरू आहे, आणि क्रिप्टोकरन्सीवरील करामध्ये वाढ करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर JioCoin भारतीय युजर्ससाठी एक नवे डिजिटल टोकन असू शकतो, ज्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. 450 दशलक्षाहून अधिक युजर्स असलेल्या Jio Platforms च्या नेटवर्कचा फायदा घेऊन JioCoin चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

हे पण वाचा : आता Aadhaar Card वरतीही मिळणार कर्ज ; जाणून घ्या सविस्तर माहिती

स्वप्नासाठी घर विकलं पण 23 व्या वर्षी IAS होऊन दाखवलंच