Jiophone Prima 2 : दिवाळीपूर्वी Jio चा धमाका; स्वस्तात लाँच केला 4G मोबाईल

Jiophone Prima 2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुकेश अंबानी यांच्या जिओने दिवाळीपूर्वीच मोठा धमाका करत ग्राहकांना एक गिफ्ट दिले आहे. जिओने ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत नवा 4G मोबाईल लाँच केला आहे. Jiophone Prima 2 असं या मोबाईलचे नाव असून मागच्या वर्षी लाँच झालेल्या JioPhone Prima 4G चे अपडेटड व्हर्जन आहे. या मोबाईल मध्ये व्हिडीओ कॉल, UPI पेमेंट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सारखे अनेक दमदार फीचर्स मिळतात. कंपनीने 2,799 रुपयांत हा मोबाईल बाजारात आणला आहे.

काय फीचर्स मिळतात? Jiophone Prima 2

जिओच्या या स्वस्तात मस्त मोबाईल मध्ये 2.4 इंचाचा QVGA कर्व्ह डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 320 x 240 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. कंपनीने या मोबाईल मध्ये क्वॉलकॉम चिपसेट वापरली आहे. फोनमध्ये 512MB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. . कंपनीने या फीचर फोनच्या फ्रंटमध्ये 0.3MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे, या कॅमेराद्वारे तुम्ही एकमेकांना व्हिडिओ कॉल करू शकता. जो व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जाऊ शकतो. कंपनीने फोनमध्ये LED टॉर्चसह रियर कॅमेराही दिला आहे. या कॅमेऱ्याद्वारे QR कोड स्कॅन करून UPI ​​पेमेंटही करता येते. पॉवरसाठी जिओने या मोबाईल मध्ये 2,000mAh ची बॅटरी बसवली आहे.

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, मोबाईल मध्ये JioTV, JioCinema, JioSaavn, JioPay सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. यूजर्स या मोबाईल वरून फेसबुक सह अन्य शोष मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा वापरू शकतात. . जिओच्या या फोनवर युजर्स युट्युब व्हिडिओही पाहू शकतात. याशिवाय फोनमध्ये एफएम रेडिओ आणि इनबिल्ट गेम्स आणि गुगल व्हॉईस असिस्टंटची सुविधाही उपलब्ध आहेत. Jiophone Prima 2 ची किंमत 2,799 रुपये आहे. हा मोबाईल फक्त लक्स ब्लू रंगात लाँच करण्यात आला असून प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon तसेच JioMart आणि Reliance Digital वरून तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकतात.