हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या युजर्सना एक आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने बंद केलेला 189 रुपयांचा स्वस्त प्रीपेड प्लान पुन्हा एकदा लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनंतर जिओने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कमी किमतीत अधिक फायदे देणाऱ्या या प्लानविषयी जाणून घेऊया.
189 रुपयांच्या प्लानचे फायदे
189 रुपयांचा हा प्लान जिओच्या सर्वात स्वस्त रिचार्ज योजनांपैकी एक आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबतच दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. 2GB डेटा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps पर्यंत मर्यादित होते. याशिवाय प्लानमध्ये 300 एसएमएस मोफत मिळतात. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे.
या प्लानमध्ये युजर्सना मनोरंजनासाठीही काही विशेष सुविधा मिळतात. जसे की जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांचे मोफत सब्सक्रिप्शन प्लानमध्ये देण्यात आले आहे. मात्र, जिओ सिनेमा प्रीमियमचा लाभ या प्लानमध्ये मिळत नाही.
जिओकडे 189 रुपयांच्या प्लानशिवाय आणखीन एक किफायतशीर पर्याय उपलब्ध आहे. जिओच्या 198 रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्येही युजर्सला दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. मात्र, या प्लानमध्ये 5G सेवेसह अनलिमिटेड इंटरनेटचा लाभ दिला जातो. तसेच, युजर्सना JioSaavn चे 14 दिवसांचे मोफत सब्सक्रिप्शनही मिळते. त्यामुळे हे दोन्ही प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतात.




