Jio चा भन्नाट रिचार्ज प्लॅन ! फ्रीमध्ये मिळवा नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि बरेच काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Recharge : जिओ ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. आजही असाच एक रिचार्ज प्लॅन जिओ घेऊन आला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना फ्रीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, 300 GB पर्यंत डेटा मिळणार आहे.

Jio चा हा एक प्रीपेड प्लॅन आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अप्रतिम Jio Plus पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. Jio वापरकर्त्यांना एकूण 5 Jio Plus प्लॅन ऑफर करत आहे. हे प्लॅन 299 ते 1499 रुपयांच्या दरम्यान आहेत. या प्लान्समध्ये तुम्हाला 300 GB पर्यंत डेटा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या OTT अॅप्सचा मोफत ऐक्सेस देखील मिळेल. याशिवाय यामध्ये जिओ सिनेमाही ऑफर केला जात आहे. अशा प्रकारे तुम्ही जाणून घ्या Jio च्या या प्लान्सबद्दल…

जिओ प्लसचे 299 आणि 399 रुपयांचे प्लॅन

कंपनीच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 जीबी डेटा मिळेल. तर 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75 GB डेटा मिळतो. पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. कंपनीचे हे दोन्ही प्लॅन दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह येतात. यामध्ये तुम्हाला जिओ सिनेमासोबत जिओ टीव्हीचा अ‍ॅक्सेस मिळेल.

Jio Plus 599 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Jio Plus चा हा प्लान वापरकर्त्यांना इंटरनेट वापरण्यासाठी अमर्यादित डेटा देतो. हा प्लॅन पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतील. तसेच प्लॅनमध्ये कंपनी Jio TV सोबत Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत ऍक्सेस देत आहे.

699 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा प्लॅन 3 अतिरिक्त फॅमिली सिमसह येतो. यामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 100 जीबी डेटा दिला जात आहे. कंपनी अतिरिक्त सिमसाठी प्रत्येक महिन्याला वेगळा 5 जीबी डेटा देखील देत आहे. पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. हा प्लॅन मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस दररोज येतो. यामध्ये तुम्हाला Jio Cinema, Jio TV आणि Amazon Prime Video सोबत Netflix Basic वर मोफत ऍक्सेस मिळेल.

Jio Plus चा 1499 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 300 जीबी डेटा मिळेल. तसेच प्लॅनमध्ये, कंपनी पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे. हा प्लान 500 GB पर्यंत डेटा रोलओव्हर देखील देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतील. तसेच या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाच्या सबस्क्रिप्शनसह मिळेल.