New Year निमित्त Jio ची खास ऑफर! या प्लॅनवर 13 महिन्यांची व्हॅलिडिटी; खर्च फक्त 7 रूपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षी न्यू इयर निमित्ताने जिओ आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत असते. यावर्षी जिओने 2,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर 24 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली आहे. ही खास ऑफर जिओच्या न्यू इयर ऑफर अंतर्गत उपलब्ध आहे. जिओचा या खास ऑफरमुळे या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च 8.21 रुपयांवरून 7.70 रुपयांपर्यंत कमी होत आहे.

नवीन वर्षाच्या निमित्ताने जिओ 2,999 रुपयांचा प्लॅन देत आहे. या प्लॅनची वैधता 12 महिने म्हणजेच 365 दिवसांची आहे. मात्र या प्लॅनच्या अंतर्गत जिओ युजरला 365 दिवसांऐवजी 389 दिवसांची वैधता देत आहे. ज्यामुळे हा प्लॅन सुमारे 13 महिने अॅक्टिव्ह राहील.

प्लॅन्स बेनिफिट्स

जिओच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5 जीबी डेटा मिळत आहे. या प्लॅनवर 5G सेवा देखील उपलब्ध आहे. जिओ ग्राहकांना या प्लॅन अंतर्गत वर्षाला सुमारे 912.5GB डेटा देत आहे. यात रोजचा डेटा संपल्यानंतर 64Kbps प्रमाणात डेटा चालेल. या प्लॅनअंतर्गत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सेवा ग्राहकांना मिळेल. तसेच, JioCinema, JioTV आणि JioCloud असे ॲप्स मोफत वापरता येतील.

ऑफर कधी पासून सुरू?

20 डिसेंबरपासूनच ही ऑफर सुरू झाली आहे. मात्र ही ऑफर कधीपर्यंत सुरू राहिली याबाबतची माहिती वेबसाईटवर देण्यात आलेली नाही.