मराठी माणसांनी बांगड्या घातल्या असे समजू नका; वाहन तोडीफोडीनंतर आव्हाडांचा बोम्मईना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्न पेटला असून कर्नाटकमधील बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रॅटीक सरकारला इशारा दिला. आम्हीही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही ठरतवले तर जशास तसे उत्तर देऊ, अशा थेट इशारा आव्हाड यांनी कर्नाटक मुख्यमंत्री बसवराह बोम्मई यांना दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणताही माणूस हा काहीही करू शकत नाही असे बोम्मईनी समजू नये. “अगर तुम कर सकते हो, तो हम भी कर सकते है, मौका सभी को मिलता है” पंतप्रधान मोदींनी बोम्मईना सांगायला हवे होते की, शांत बसा म्हणून. मात्र, त्यांनी सांगितल नाही. एवढे आक्रमक होण्याची काहीच गरज नाही. महाराष्ट्र कर्नाटक हा वाद १९४६ पासून चालू आहे. त्यामुळे अजून आक्रमक होऊ नका, मराठी माणूस आक्रमक झालं तर काहीही होईल, असा इशारा आव्हाड यांनी दिला.

फडणवीसांचा बोम्मईना फोन, सीमाभागात महाराष्ट्राच्या ट्रकवरील दगडफेकीचा निषेध

हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन केला. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ झालेल्या घटनेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी आणि निषेध नोंदवण्यात आला.