आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांचा बाबासाहेब आंबेडकरांवर निशाणा?? पहा नेमकं काय म्हणाले….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यापूर्वी प्रभू श्रीराम मांसाहार करायचे असं विधान करणाऱ्या आव्हाडांनी आता थेट आरक्षणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे. ‘न्यायव्यवस्थेत आरक्षण असायला पाहिजे होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे. काही निर्णय असे येतात की, त्यात जातीयवादाचा वास यायला लागतो.’ असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित केलेल्या समता परिषदेत (Samta Parishad) बोलत असताना आव्हाड म्हणाले कि, मला आजही वाईट वाटतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर त्यांनी अन्याय केला. मी बोलत नाही कारण वाद निर्माण होतो. परंतु काही काही जजमेंट अशी येतात त्यातून आपल्याला लगेच समजत की यातून जातीचा वास येतोय. न्याय व्यवस्था ही नॉन बायस असली पाहिजे.. अशी संविधानाची अपेक्षा आहे पण खरंच असं होतं का? आता कुठे तरी बार कॉन्सिलमध्ये बहुजन लोक दिसायला लागलेच. त्यांच्या पिढ्याच शिकल्या नाहीत, मग बारमध्ये कसे जातील? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

दरम्यान, यापूर्वी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होते. प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. ते शिकार करून खायचे त्यामुळे प्रभू श्रीराम हे आमचे आहेत म्हणजेच बहुजनांचे आहेत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होते. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. मात्र आपण आपल्या विधानावर ठाम आहोत पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो अशी प्रतिक्रिया त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.