JNPT Highway : आता बदलापूर ते पनवेल प्रवास केवळ 15 मिनिटांत; माथेरानच्या डोंगरांतून जाणार बोगदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

JNPT Highway : राज्यभरात रस्त्यांची एकमे हाती घेतली आहेत. यातील काही रस्ते तयार झाले आहेत तर काही रस्ते प्रगतीपथावर आहे. यापैकी बदलापूर ते पनवेल हा रस्ता सुद्धा प्रगतीपथावर असून हे अंतर आता अवघ्या पंधरा मिनिटात पार करता येणार आहे. जेएनपीटी (JNPT Highway) वडोदरा महामार्गातील बोगदाचे काम प्रगतीपथावर असून माथेरानच्या पर्वतरांगांमधून या बोगदाचा काम 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे त्यामुळे बदलापूर आणि पनवेलकरांचा प्रवास आता सुपरफास्ट होणाऱ्या शंका नाही. या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. या बोगद्यामध्ये दोन मार्गिका असणार आहेत.

15 मिनिटात होणार प्रवास (JNPT Highway)

या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा दीड तासांचा प्रवास फक्त पंधरा मिनिटात होणार आहेत. हे अंतर जवळपास 38 किलोमीटरचे असून बदलापूर कटाई रोड मार्गे तळोजा बायपास द्वारे खोणी तलोळा मार्गे पनवेल ला जाता येते. या बोगद्यामुळे (JNPT Highway) वळसा न घालता थेट बोगदातून अवघ्या पंधरा मिनिटात प्रवास होणार आहे. 2025 पर्यंत या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे टार्गेट आहे. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

दोन महत्वाच्या महामार्गाला जोडणार (JNPT Highway)

औद्योगिक दृष्ट्या हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार असून या महामार्गावर (JNPT Highway) जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज दिला जाणारा मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग या महामार्गाला जोडले जाणार आहेत. नवी मुंबई पालघर गुजरात नाशिक नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे या महामार्गामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.