पाटबंधारे विकास मंडळात ‘या’ पदासाठी होणार भरती; सविस्तर माहिती जाणून आजच अर्ज करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तरुणांसाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पाटबंधारे विकास मंडळाकडून (Irrigation Development Board) भरती प्रक्रिये संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक तरुण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. हे अर्ज स्वीकारले गेल्यास तुम्हाला थेट पाटबंधारे विकास मंडळात नोकरी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी कोणतीही वेळ न घालवता सर्व माहिती जाणून त्वरित अर्ज करावा.

कोणत्या पदासाठी भरती होणार?

ही भरती प्रक्रिया वकील या पदासाठी करण्यात येत आहे. काही ठराविक उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात येईल. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी बोलवले जाईल. यासाठी फोन किंवा ई-मेल पाठवला जाईल. त्यामुळे सर्वात प्रथम व्यवस्थितरित्या अर्ज भरणे महत्त्वाचे आहे. या अर्जामध्ये कोणतीही खोटी माहिती भरता कामा नये.

अर्जाची प्रकिया

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे. भरतीसाठी मंडळाकडून शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. तसेच सोबत अनुभव असणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला या भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर https://wrd.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी. परंतु हे लक्षात ठेवावे की, अर्जासाठी शेवटची तारीख 10 मार्च आहे.